गोवा : राज्यात येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांवर चार वर्षांत ७. ८९ कोटी खर्च

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th March, 04:35 pm
गोवा : राज्यात येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांवर चार वर्षांत ७. ८९ कोटी खर्च

पणजीः गेल्या चार वर्षांत राज्यात येणाऱ्या ८०० व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पाहुण्यांवर गोवा सरकारने तब्बल ७.८९ कोटी रुपये खर्च केलेत. सरवाज अधिक करच हा २०२२ साली केला. तेव्हा २.८६ कोटी रुपये खर्च कण्यात आले होते.  पाहुण्यांची राहण्याची, जेवणाची आणि फिरण्याची सोय करण्यासाठी हा खर्च आला, अशी माहिती  शिष्टाचार खात्याच्या हवाल्याने मिळाली आहे. 

विधानसभेत केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी विचारलेल्या प्रश्नाचे लेखी उत्तर शिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिले.  विविध कारणांसाठी गोव्याला भेट देणारे केंद्रीय मंत्री,राज्यमंत्री, सरकारी अधिकारी आणि इतर राज्यातील मंत्री आणि राजकीय पाहुणे यांना पुरवण्यात आलेले अधिकारी, वाहने, राहण्याची व्यवस्था आणि जेवणाच्या सोईवर गेल्या चार वर्षांत ७,८९,२५,७२७ रुपये खर्च आला आहे. 

आकडेवारी : 

गेल्या चार वर्षांत ८०७ पाहुण्यांची सरकारी पाहुणचार घेतला. २०२०  मधील जानेवारी ते डिसेंबरमध्ये ५७ पाहुणे गोव्यात आले. त्यांच्यावर सुमारे ४१.३३ लाख इतका खर्च झाला आहे.  २०२१ साली जानेवारी ते डिसेंबर दरम्यान आकडा वाढला. या काळात तब्बल १६० पाहुण्यांनी सरकारी पाहुणचार घेतला. त्यांच्यावर सरकारने तब्बल २.२२ कोटी रुपये खर्च केले. दरम्यान २०२२ साली गोव्यात तब्बल १८६ व्हीआयपी गोव्यात आले. त्यांच्यावर सरकारने सुमारे २.८६ कोटी रुपये खर्च झाले. 

दरम्यान २०२३ साली पाहुण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहण्यात आली. यावर्षी तब्बल २३६ विविध कारणांसाठी पाहुण्यांनी गोवाला भेट दिली. यावेळी सरकारने तब्बल १.४० कोटी रुपये खर्च केले. २०२४ साली १४१ पाहुण्यांनी गोव्याला भेट दिली त्र सरकारला सुमारे ९८.६१ लाख रुपयांचा खर्च आला. दरम्यान, २०२५च्या १ जानेवारी ते ६ मार्च पर्यंत, ३१ पाहुण्यांनी गोव्याला भेट दिली असून त्यांच्यावर सुमारे ४.१० लाख रुपये खर्च केले आहेत.    






हेही वाचा