बंगळुरूसारखी मोठी शहरे १२ तास बंद राहणार असल्याने सरकार आणि उद्योग क्षेत्राला किमान ४० अब्ज रुपयांचा तोटा संभवतो.
बेळगाव : भाषावादाच्या मुद्यावरून सीमाभागात पुन्हा तणावग्रस्त स्थिती उद्भवली आहे. मागेच कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसचालक आणि वाहकाच्या तोंडावर काळे फसून मारहाण करण्यात आली. दोन दिवसांत हा मुद्दा मिटवण्यात आला. पण, नंतर प्रादेशिक अस्मितेच्या नावावर कानडी समर्थक संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला. याच अनुषंगाने आज शनिवारी कर्नाटकात बंद असल्याने महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस राज्यात प्रवेश करू शकल्या नाहीत. महाराष्ट्रातील बसेस आता फक्त कर्नाटक सीमेपर्यंतच धावत आहेत. त्यामुळे येथील जनता आणि प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
काल रात्री महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या अनेक बसेसना परतावे लागले. बेळगावसह कर्नाटकच्या विविध भागातून प्रवास करणाऱ्या या बस त्यांच्या ऐच्छिकस्थानावर पोहोचू शकल्या नाहीत. बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली आणि रात्रीच सर्व बसेस पुन्हा महाराष्ट्र सीमेवर परत पाठवल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलले, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल.
परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र परिवहन महामंडळानेही बस सेवा मर्यादित केल्या आहेत. कर्नाटकातील परिस्थिती सामान्य होईपर्यंत बसेस सीमेपलीकडे जाणार नाहीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना त्रास होत आहे. विशेषतः दैनंदिन कामासाठी किंवा महत्त्वाच्या प्रवासासाठी या बसेसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
कर्नाटक बंदचा परिणाम रस्ते वाहतुकीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्र ते कर्नाटक रस्त्यांवरील बस वाहतूक ठप्प आहे. प्रवाशांना आता खाजगी वाहनांचा किंवा वाहतुकीच्या इतर साधनांचा अवलंब करावा लागतो. पोलिस आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत.
तथापि, कर्नाटकात हा बंद किती काळ सुरू राहील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिस्थिती सामान्य होताच बस सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असे महाराष्ट्र परिवहन महामंडळाने सांगितले. तोपर्यंत प्रवाशांना धीर धरण्याचा आणि पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २२ मार्च २०२५ रोजी कर्नाटकात कन्नड समर्थक संघटनांनी १२ तासांच्या राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. बेळगावमध्ये एका बस कंडक्टरवर मराठी न बोलल्याबद्दल झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा बंद आहे.
विशेषतः बेळगावसारख्या सीमावर्ती भागात. कन्नड ओक्कुटा सारख्या संघटनांनी याला कन्नड अस्मितेवरील हल्ला मानले आणि मराठी समर्थक गटांवर बंदी घालण्याची मागणी केली. याशिवाय, ते बेंगळुरूला अनेक प्रशासकीय झोनमध्ये विभागण्याच्या प्रस्तावाविरुद्ध आणि कन्नड भाषिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागण्या देखील करत आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. याचा वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान एका माहितीनुसार,बंगळुरूसारखी मोठी शहरे १२ तास बंद राहणार असल्याने सरकार आणि उद्योग क्षेत्राला किमान ४० अब्ज रुपयांचा तोटा संभवतो.