अखेर सुनीता विलियम्स आज परतणार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
अखेर सुनीता विलियम्स आज परतणार

नवी दिल्ली : सुनीता विल्यम्स अंतराळातून अखेर ९ महिन्यांनी मंगळवारी परत येणार आहेत. आठ दिवसांच्या छोट्या मोहिमेवर गेलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुच विल्मोर यांना जवळपास नऊ महिने अंतराळात घालवावे लागले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे पुन्हा पृथ्वीवर येणे पुढे पुढे ढकलले जात होते. पण, आता अखेर १८ मार्चला त्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतणार आहेत.
दरम्यान, अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे गेल्या जवळपास २८० दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये (आयएसएस) मध्ये आहेत. गेल्यावर्षी ५ जून २०२४ रोजी सुनिता आणि विल्मोर हे बोईंग स्टारलायनर या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून हे उड्डाण झाले होते. आता हे दोघेही पृथ्वीवर परतण्याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.