क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे स्पर्धेचे आयोजन
मडगाव : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत कोंब मडगाव येथील श्री दामोदर विद्यालय इंग्लिश हायस्कूलने सासष्टी तालुका अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी घोगळ येथील भाटीकर मॉडेल हायस्कूलचा पराभव केला.
भाटीकर हायस्कूलने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून ८९ धावा केल्या. भाटीकरच्या प्रथम गावकरने २४ धावा, सांज नाईक याने २० धावा केल्या. श्री दामोदर हायस्कूलच्या अभिषेक लमाणीने ९ धावांत ४ गडी बाद केले. तर अनश कश्यपने २ गडी बाद केले.
दामोदर हायस्कूलने हे लक्ष्य १६व्या षटकात ४ गडी गमावून गाठले. रूमन मुल्लाने ३० धावा, फैय्याज शेखने २४ धावा व चिंतन लमाणीने १७ धावा केल्या. भाटीकरच्या अयान बोरकरने २ गडी तर साहिल व वेदांत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.