दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धा : महिलांमध्ये दक्षिण वॉरियर्स संघ अजिंक्य
पणजी : दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धेत दामबाबा इलेव्हन संघाने विजेतेपद पटकवले. स्पर्धेचे आयोजन अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघातर्फे करण्यात आले होते.
या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल प्रॅक्टिशनर अॅण्ड निवृत्त लेफ्टनंट कर्नल विनोद साळकर, संगीतकार घाटवळ उपस्थित होते. यावेळी सिमरन हळदणकर हिचा दक्षिण आशिया कराटे चॅम्पियनशीप २०२४ मध्ये कांस्यपदक मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत संपूर्ण गोव्यातून एकूण १४ संघासह २ महिला संघांनीही सहभाग घेतला होता. अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण असोसिएशन यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीमा वेर्णेकर यांनी पाहुण्यांचे आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले आणि असोसिएशनने वर्षभरात केलेले सर्व कार्यक्रम, उपक्रम आणि इतर सामाजिक कार्याची माहिती दिली.
दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धेतील पुरस्कार
पुरुष विजेता संघ : दामबाब इलेव्हन, उपविजेता : डायनॅमिक क्रिकेटर्स, मालिकावीर : आयुष वेर्लेकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज : अमृत वेर्लेकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज : दीप्तेश हळदणकर, अंतिम फेरीचा सामनावीर : यश कासवणकर, सर्वोत्तम झेल : मिथील कारेकर, सर्वाधिक षटकार : आयुष वेर्लेकर, उदयोन्मुख खेळाडू : यश कासवणकर, महिला विजेता संघ : दक्षिण वॉरियर्स, महिला उपविजेता संघ : बार्देश रिगल्स, महिला सामनावीर : स्नेहल वाळके.