जीसीएकडून गोव्याच्या संघाची घोषणा : ५ ते १३ मार्च दरम्यान स्पर्धा
पणजी : गोव्याच्या क्रिकेट संघाची जबाबदारी पूर्वा भाईडकर हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. २३ वर्षांखालील महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा त्रिवेंद्रम येथे खेळवण्यात येणार आहे.
२३ वर्षांखालील महिलांची ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा ५ मार्च ते १३ मार्च दरम्यान खेळवण्यात येणार असून या स्पर्धेसाठी गोव्याच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.
गोव्याचा संघ : पूर्वा भाईडकर (कर्णधार), सेजल सातार्डेकर (उपकर्णधार), तनिषा गायकवाड (यष्टिरक्षक), कृपा पटेल, हर्षित यादव, उस्मा खान, हर्षदा कदम, तनया नाईक, उर्वशी गोवेकर, भारती सावंत, विधी भंडारे, मेथाली गवंडर, साक्षी गावडे, पूजा यादव, खुशी बांदेकर, प्रेशा नाईक, पूजा निषाद, सानिका धुरी.
या स्पर्धेत गोव्यासह यजमान केरळ, पंजाब, हरियाणा, सौराष्ट्र, मंघालय, ओडिशा, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मिझोरम, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, नागालँड, छत्तीसगड, हैदराबाद, आसाम, उत्तराखंड. अरूणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, चंदीगड, सिक्कीम, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, त्रिपुरा, मणिपूर, विदर्भ, आंध्र, मुंबई, बरोडा, तामिळनाडू यांचे संघ सहभागी होणार आहेत.
गोव्याचे स्पर्धेतील सामने
या स्पर्धेत गोव्याचा पहिला सामना मिझोरमशी ५ मार्च रोजी होणार आहे. गोव्याचा दुसरा सामना ७ मार्च रोजी कर्नाटकशी, तिसरा सामना ९ मार्च रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध, चौथा सामना ११ मार्च रोजी जम्मू आणि काश्मिरशी तर पाचवा व अंतिम गट सामना झारखंडशी होणार आहे.