पेडणे : मांद्रे अपघात प्रकरण : दिपन बत्राला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th February, 04:04 pm
पेडणे : मांद्रे अपघात प्रकरण : दिपन बत्राला ४ दिवसांची पोलीस कोठडी

पणजी : जुनसवाडा, मांद्रे येथील मारियाफेलिझ फर्नांडिस हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी दिपन याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी बत्राला अटक करून थेट न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यासंदर्भात स्थानिकांसह आमदार जीत आरोलकर यांनी संशयिताला न्यायालयीन कोठडीऐवजी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.  आज त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल मारियाफेलीज फर्नांडिस हिच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मारियाफेलिझ फर्नांडिसच्या घरची परिस्थिती हलाखीची

मारियाफेलिझ फर्नांडिसचे राहते घर अत्यंत धोकादायक स्थितीत असून ते केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना सरकारने लवकरात लवकर आर्थिक मदत करून तिला नवीन घर उभारून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.  


बातमी अपडेट होत आहे.       


हेही वाचा