निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd February, 10:05 pm
निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जारी

पणजी : राज्यातील प​हिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षातच नवे बेंच मिळणार आहेत. नव्या बेंचसंदर्भातील निविदा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (पीडब्ल्यूडी) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत बेंच खात्याला मिळाल्यानंतर ते शिक्षण खात्याला देण्यात येणार असल्याची माहिती ‘पीडब्ल्यूडी’च्या सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
विविध भागांतील सरकारी शाळांमधील बेंच खराब झालेले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांनाही आरामदायक बसता यावे, यासाठीच शिक्षण खात्याने अशा शाळांना नवे बेंच देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार ही जबाबदारी ‘पीडब्ल्यूडी’कडे देण्यात आलेली होती. ‘पीडब्ल्यूडी’ने याबाबतची निविदाही जारी केली आहे. परंतु, नवे बेंच तयार झालेले नाहीत. पुढील काही दिवसांत नवे बेंच मिळण्याची शक्यता असल्यामुळे​ पुढील शैक्षणिक वर्षापासूनच विविध भागांतील शाळांना नवे बेंच पुरवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.              

हेही वाचा