प्रयागराजमधील पाण्याबाबत 'सीपीसीबी'चा धक्कादायक अहवाल! हे पाणी फक्त पिण्यासाठी नव्हे तर...

रोज लाखो भाविक महाकुंभमेळ्यात उपस्थित राहून घेत आहेत अमृतस्नानाचा लाभ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th February, 05:54 pm
प्रयागराजमधील पाण्याबाबत 'सीपीसीबी'चा धक्कादायक अहवाल! हे पाणी फक्त पिण्यासाठी नव्हे तर...

उत्तर प्रदेश : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात कोट्यवधी लोकांनी हजेरी लावली आहे. तर रोज लाखो भाविक प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात उपस्थित राहून संगमावर जाऊन अमृतस्नान करत आहेत. मात्र असे असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) प्रयागराजमधील संगमाच्या ठिकाणच्या पाण्याच्या दर्जाबाबत धक्कादायक अहवाल दिला आहे.

संगमाच्या ठिकाणी असलेले पाणी आंघोळीसाठी अजिबात योग्य नाही, तसेच हे पाणी प्राशन करण्यालायकही नाही, असे मंडळाने म्हटले आहे. 

महाकुंभाच्या समारोपापूर्वी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणकडे म्हणजेच 'एनजीटी'ला एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.  या अहवालामध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमध्ये फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नदीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ दिसून आली आहे.

महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमधील विविध ठिकाणी असलेल्या फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण आंघोळीसाठी प्राथमिक पाण्याच्या गुणवत्तेसाठी योग्य नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये कुंभमेळ्यावेळीही पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचे आढळून आले होते. गंगेच्या पाण्याबाबत गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

हेही वाचा