पेडणे : तुये येथे कारची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

चारचाकी चालकाला अटक, तुये पेट्रोल पंपानजीक घडली दुर्घटना

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
18th February, 02:43 pm
पेडणे : तुये येथे कारची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

पेडणे : तुये पेट्रोल पंप जवळ अर्टिका (जीए ११ टी १६७२) आणि दुचाकी (जीए ०३, एके ६१२५) याच्यात समोरासमोर अपघात होऊन दुचाकी चालक राज पेडणेकर हा २५ वर्षीय युवक जागीच ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार अर्टिका चालक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. मात्र पेट्रोल पंप बंद असल्यामुळे पंपवरुन टर्न घेताना त्यांची धडक विरुद्ध दिशेने तुये मार्गे पेडण्याला जाणाऱ्या दुचाकीला बसली. या धडकेत दुचाकीस्वार राज पेडणेकर रस्त्यावर फेकला गेला आणि जागीच गतप्राण झाला.

राज हा मूळ डिचोलीचा रहिवासी असून सध्या तो शिवोली येथे वास्तव्याला आहे. सुरुवातीला काही काळ त्याने गॅरेज चालवण्याचे काम केले होते. त्याच्या पश्चात एक भाऊ आणि आई आहे. भाऊ बारावी मध्ये शिक्षण घेत आहे. 

मांद्रे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या अपघाताप्रकरणी वाहन चालक सौरव गुडेकर, नेमळे, वेंगुर्ला याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 

हेही वाचा