जून २०२४ मधील घटना : मायना कुडतरी पोलिसांकडून गुन्हा नोंद
मडगाव : दुपारच्या जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये आलेल्या मायलेकीवर रेस्टॉरंटच्या कामगारानेच लैंगिक अत्याचार केला. ही घटना जून २०२४ मध्ये घडली होती. याप्रकरणी संशयित अविनाश राठोड याच्याविरुद्ध मायना कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मायना कुडतरी पोलिस ठाण्यात संशयित अविनाश राठोड याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना जून २०२४ मधील असून पीडितेकडून आता तक्रार करण्यात आल्यानंतर मायना कुडतरी पोलिसांकडून गुन्हा नोंद केलेला आहे. पीडित युवती आपल्या आईसह दुपारचे जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलेली होती. त्यावेळी त्या रेस्टॉरंटमधील कामगाराने युवतीला वॉश बेसिनच्या खोलीत बंद करून घेत मारहाण करत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या आईवरही जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.