आश्वे-मांद्रे येथे लागलेली आग. (निवृत्ती शिरोडकर )
पेडणे : आश्वे-मांद्रे आजोबा मंदिर समुद्रकिनारी भागातील टेन सेंड या रिसॉर्ट परिसरात शॉर्टसर्किटमुळे आज लागल्याने दोन जनरेटर आणि काही पत्रे व साहित्य जळून ३० लाखांचे नुकसान झाले. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आश्वे-मांद्रे येथील आजोबा मंदिर शेजारी टेन सेंड हे रिसॉर्ट उभे राहिले होते. १७ रोजी सकाळी १० नंतर विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे वीज गायब झाली होती. त्यामुळे जनरेटर सुरू करण्यात आला. जनरेटर सुरू केल्यानंतर काही वेळात वीज आली. परंतु, जनरेटर बंद झाला नाही. त्यामुळे वीज आणि जनरेटर यांचा संघर्ष होऊन शॉर्टसर्किट झाले आणि त्यात हॉटेलचे २ जनरेटर आणि परिसरात आग लावून तीस लाखांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान सोसावे लागले. याची माहिती पेडणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मिळतात अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परिसरात इतर ठिकाणी आग जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसानी होणार होती. धोका पत्करून पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली त्यामुळे इतर नुकसान टाळले. तत्पूर्वी हॉटेलचे दोन्ही जनरेटर जळून खाक झाले होते. शिवाय काही प्रमाणात झोपड्यांच्या छपरांना आग लागून त्याचेही नुकसान झाले. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिकांनीही सहकार्य करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.