निषाद शेवडे, दिमित्री स्मरनोव्ह, सिद्धार्थ नुनेस, प्रिन्स ॲग्नेलो जोव्हेन डिसिल्वा विजयी
पणजी : मडगाव बीपीएस स्पोर्ट्स क्लब येथे बाळे बीपीएस ओपन २०२५ या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीस शनिवारपासून सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अर्नम घोष यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ६-१ अशा प्रभावी विजयासह पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरी गटातील पुढील सामन्यांमध्ये पृथ्वी नाईकने किशोर मैत्रीवचा ६-० असा एकतर्फी पराभव केला, तर अनुप सरदेसाईंनी विहान प्रिजीथ कृष्णनवर ६-१ ने सहज विजय मिळवला. इतर सामन्यांमध्ये सुरेश नाईकने चेतन दत्ताराम राणे ६-२ ने पराभूत केले, राहुल पिंटोने सौरभ त्रिवेदीवर ६-३ अशी मात केली, तर जुवावं सोझाने विनोद कुमारचा ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला.
पुरुषांच्या खुल्या एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत निषाद शेवडे, दिमित्री स्मरनोव्ह, सिद्धार्थ नुनेस आणि प्रिन्स ॲग्नेलो जोव्हेन डिसिल्वा यांनी प्रभावी कामगिरी करत अनुक्रमे अमुल्य सेठी, जोशुआ कार्दोझो, डॉ. सूरज एस. पाटलेकर आणि जुवावं सौसावर ६-० अशा एकतर्फी विजयाची नोंद केली. अर्नम घोष यांना पहिल्या फेरीत बाय मिळाली, तर पंकज नाईक यांनी अनुप सरदेसाई आणि ॲलन फर्नांडिस यांच्यावर ६-१ अशा सहज विजय मिळवले. लिंडन जेपीने अरहान गावकरला ६-२ ने पराभूत केले, जय गिलने सौरिश नाईकवर ६-३ असा विजय मिळवला, तर पृथ्वी नाईकला कठीण सामना खेळावा लागला, पण अखेर वेस रायन कार्दोझोला ६-४ ने मात देत पुढील फेरीत स्थान मिळवले. .प्री-क्वार्टर फायनल असलेल्या तिसऱ्या फेरीत अर्नाम घोषने लिंडन जेपीचा ६-१ असा सहज पराभव केला. त्याचप्रमाणे सिद्धार्थ नूनेसने ओजस्वी सिंग मानविरुद्ध ६-० असा सहज विजय मिळवला.
या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेला बाले रिसॉर्ट गोवा आणि गोवा स्टेट टेनिस असोसिएशन (जीएसटीए) यांचे समर्थन लाभले आहे.