वास्को येथून चिप्स नेणाऱ्या ट्रकचा रामनगर येथे अपघात

चालक जखमी : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घटना

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
03rd February, 12:03 am
वास्को येथून चिप्स नेणाऱ्या ट्रकचा रामनगर येथे अपघात

जोयडा : वास्को येथून चिप्स भरून घेऊन येणाऱ्या ट्रकचा रामनगर येथे अपघात घडल्याने चालक जखमी झाला आहे. अनेक वर्षापासून बंद झालेली चिप्सची वाहतूक १ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

दांडेली येथील पेपरमीलसाठी कच्चा माल म्हणून लाकडांच्या लहान लहान तुकड्यांचा (चिप्स) चा वापर केला जातो. ही चिप्स आफ्रिका देशातून गोव्यात वास्को बंदरावर आणली जाते. त्यानंतर ट्रकमधून भरून ती दांडेलीत आणली जाते. मात्र, या चिप्सची आयात बंद असल्याने अनेक वर्षांपासून गोवा ते दांडेली चिप्सची वाहतूक बंद होती. चिप्सची पुन्हा आयात सुरू झाल्याने १ फेब्रुवारीपासून तिची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, या हंगामातील पहिलीच चिप्स वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात घडला आहे.

जी. ए. ०९ यू ०३३३ हा ट्रक वास्को येथून चिप्स भरून दांडेलीला येत होता. रामनगर येथील चर्चजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याबाहेर जाऊन अपघात घडला. अपघातात सुदैवाने चालक बचावला. 

हेही वाचा