आज थिएटर्स तथा ओटीटीवर रसिकांसाठी मनोरंजानाची मेजवानी मिळणार आहे. थिएटर्समध्ये शाहीद कपूरचा बहुचर्चित ‘देवा’ प्रदर्शित होणार आहे. तर ओटीटीवर ‘द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स’ ही थरारक दृश्यांनी भरलेली मालिका डिस्ने+ हॉटस्टारवर झळकणार आहे.
द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स । डिस्ने+ हॉटस्टार
हि एक रहस्यमय थ्रिलर मालिका आहे. जी एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या अवतीभवती फिरते. त्याला कळते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लपवलेल्या खजिन्याचे रक्षण त्यांचे मावळे आजही करत आहेत आणि त्या मावळ्यांचा त्याच्याशी काहीतरी संबंध आहे. या मालिकेत राजीव खंडेलवाल, सई ताम्हणकर आणि आशिष विद्यार्थी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
देवा । थिएटर्स
एका वर्षाच्या विश्रांतीनंतर शाहिद कपूर मोठ्या पडद्यावर ‘देवा’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. देवा हा एक रोमांचक अॅक्शन थ्रिलर आहे चित्रपट आहे, जो एका प्रामाणिक आणि बंडखोर पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरतो. जो एका हाय-प्रोफाइल प्रकरणाचा उलगडा करताना फसवणुकीचे आणि गुंतागुंतीचे जाळे सोडवतो. पुढे जे घडते ते तुम्हाला पडद्यावर खिळवून ठेवेल.
द स्नो गर्ल सीझन २ । नेटफ्लिक्स
ही मालिका पत्रकार मिरेन रोजो भोवती फिरते. एक गूढ संदेश मिळाल्यानंतर, मिरेन मालागा येथील एका उच्चभ्रू शाळेत घडलेल्या एका मुलीच्या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करते. त्यातून तिला अनेक धक्कादायक उलगडे होत जातात. ही मालिका अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलने भरलेली आहे.
आयडेंटिटी । झी ५
अभिनेता टोव्हिनो थॉमस आणि त्रिशा अभिनीत हा मल्याळम क्राइम थ्रिलर चित्रपट एका पोलीस अधिकाऱ्याचे कथानक आहे. जो एका खूनाचा तपास करताना एका स्केच आर्टिस्ट आणि प्रत्यक्षदर्शीची मदत घेतो. त्यानंतर कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्नस् येतात.
कॉम्पॅनियन । थिएटर
सोफी थॅचर आणि जॅक क्वाइड अभिनीत, हा भयपट मित्रांच्या एका गटाची कथा आहे. जे आपला विकेंड साजरा करण्यासाठी एका निर्जन तलावाच्या ठिकाणी जातात आणि तिथे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि घटनांची एक प्राणघातक साखळी सुरू होते.
बॅड जीनियस । लायन्सगेट प्ले
बॅड जीनियस हा २०१७ मध्ये त्याच शीर्षकाच्या थाई चित्रपटाचा इंग्रजी रिमेक आहे. हा चित्रपट हुशार वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या गटावर केंद्रित आहे. जे एक घोटाळेबाज विद्यालयातील प्रवेश प्रणाली नष्ट करण्यासाठी एक मनोरंजक योजना आखतात. पुढे काय घडते ते आपल्याला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल.
लुक्काज वर्ल्ड । नेटफ्लिक्स
हा हृदयस्पर्शी चित्रपट त्याच नावाच्या पुस्तकापासून प्रेरित आहे. मारियाना चेनिलो दिग्दर्शित या चित्रपटा बारबरा मोरी प्रमुख भूमिकेत आहे. जी सेरेब्रल पाल्सी रोगाने ग्रस्त आपल्या मुलाच्या उपचारासाठी सर्वताेपरी प्रयत्न करते आणि अखेर ती आपल्या कुटुंबासह भारतात येते.