बार्देश : कळंगुटमध्ये ९५ हजारांचा गांजा जप्त; एकास अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
2 hours ago
बार्देश : कळंगुटमध्ये ९५ हजारांचा गांजा जप्त; एकास अटक

म्हापसा : कळंगुट येथे पोलिसांनी ड्रग्स विरोधी कारवाई अंतगर्त छापा टाकून संशयित आरोपी सचिन राठोड (२५ , रा. गौरावाडा कळंगुट व मूळ बिजापूर कर्नाटक) यास अटक केली. संशयिताकडून ९५ हजारांचा ९५० ग्रॅम गांजा जप्त केला.

 नायकावाडा येथील एचपी गोदामजवळ ड्रग्सचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी २१ रोजी मध्यरात्री सापळा रचून संशयित आरोपीला पोलीस पथकाने पकडले. झडतीवेळी त्याच्याजवळ  गांजा सापडला.

 नंतर पोलिसांनी संशयिताविरूध्द ड्रग्स प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश मांद्रेकर, अपेक्षा उसापकर, कॉन्सटेबल राज परब, रविंद्र गावकर, सिध्दांत लामगावकर, रोहन नाईक व रामा गावकर या पथकाने ही कामगिरी केली.  


हेही वाचा