पेडणे : मांद्रे कॉलेजच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांना त्याचा त्रास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
3 hours ago
पेडणे : मांद्रे कॉलेजच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांना त्याचा त्रास

पेडणे : मांद्रे  पंचायत इमारतीच्या मागे साठवून ठेवलेल्या कचऱ्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. याचा फटका येथून प्रवास करणाऱ्या लोकांना आणि मुख्यत्वे मांद्रे कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो. पंचायतीकडे याबाबत अनेक वेळा तक्रार देऊनही ही समस्या अद्यापही सुटलेली नाही. आरोग्य खात्याचे देखील याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. 




येथे पंचायतीतर्फे मोठ्याप्रमाणात कचरा साठवून ठेवण्यात आला आहे. लोकांनी तसेच विद्यालयाने देखील कचऱ्याची जागा सदर ठिकाणहून अन्यत्र स्थलांतरित करावी अशा आशयाचे लेखी निवेदन अनेकदा पंचायत मंडळाकडे सादर केले आहे. पण याकडेही कानाडोळा करण्यात आला.  हा कचरा येथून उचलण्यात न आल्यास येथून ये जा करणाऱ्या मुलांना आणि इतरांना रोगराईची बाधा होऊ शकते असेही स्थानिकांनी येथील गोवन वार्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. संबंधित खाते आणि विभागाने यात लक्ष घालावे आणि कॉलेजची मुले आणि लोकांची या दुर्गंधीच्या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केले आहे. 


हेही वाचा