अधिकृत लिंकवर क्लिक करून भरा अर्ज
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी (प्राथमिक) परीक्षेसाठीची अधिसूचना आज २२ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे . नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला युपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अर्ज करण्यासाठी थेट लिंक मिळेल. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर देखील अधिसूचना पाहू शकतात. या वर्षी युपीएससीने जारी केलेल्या वार्षिक कॅलेंडरनुसार, युपीएससी सीएसई परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२५ आहे.
खालील लिंकवर क्लिक करत नोटिफिकेशन पाहू शकता.
Civil Services (Preliminary) Examination, 2025
कॅलेंडरनुसार, युपीएससी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २५ मे २०२५ रोजी होणार आहे. परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारचे (ऑब्जेक्टिव टाईप ) पेपर असतील, जनरल स्टडीज I आणि जनरल स्टडीज II. दोन्ही पेपर २००-२०० गुणांचे असतील म्हणजेच ही परीक्षा एकूण ४०० गुणांची असेल. ही प्राथमिक परीक्षा फक्त एक स्क्रिनिंग टेस्ट असल्याने त्याचे गुण मुख्य परीक्षेत जोडले जाणार नाहीत, परंतु प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवारच मुख्य परीक्षेला बसू शकतात असाही एक नियम आहे.
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम, युपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
- त्यानंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या युपीएससी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, येथे उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
- एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, आपल्या खात्यात लॉग इन करा.
- त्यानंतर अर्ज भरा आणि अर्जाची फी भरा.
- आता सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
- भविष्यासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
अर्ज फी किती आहे?
बेंचमार्क अपंगत्व असलेल्या महिला/SC/ST/उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर/रुपे/क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय मोडमध्ये १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
वन सेवेची अधिसूचना देखील जारी
युपीएससी नागरी सेवा परीक्षेसोबत, आज भारतीय वन सेवा (प्राथमिक) परीक्षा २०२५ ची अधिसूचना देखील जारी केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील ११ फेब्रुवारी आहे. या भरतीसाठी प्रिलिम परीक्षा देखील २५ मे २०२५ रोजी नियोजित करण्यात आली आहे.
खालील लिंकवर क्लिक करत तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता.
Indian Forest Service (Preliminary) Examination, 2025 Through CS(P) Examination 2025
सामान्य श्रेणीतील उमेदवार युपीएससी परीक्षा ६ वेळा देऊ शकतात. तर ओबीसी पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील उमेदवारांना परीक्षेत बसण्यासाठी ९ संधी असतात. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी मर्यादा नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही युपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.