ब्राजील : नायजेरिया बनला ब्रिक्स परिषदेचा अधिकृत सदस्य; ब्राजीलने केली घोषणा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
ब्राजील : नायजेरिया बनला ब्रिक्स परिषदेचा अधिकृत सदस्य; ब्राजीलने केली घोषणा

रिओ दी जानेरो : आफ्रिका खंडातील नायजेरिया हा देश शुक्रवारी औपचारिकपणे ब्रिक्स परिषदेचा भागीदार सदस्य बनला. ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सदर घोषणा केली.  बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकिस्तान, मलेशिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तानसह नायजेरिया आता ब्रिक्स परिषदेचा अधिकृत सदस्य बनला आहे. ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद सध्या ब्राजीलकडे असून अध्यक्ष देशाला मिळणाऱ्या अधिकारांचा वापर करत नायजेरियाला हा दर्जा देण्यात आला आहे. 


Nigeria Joins BRICS: What Does it Mean for the Global Economy?


 जगातील सहाव्या क्रमांकाची लोकसंख्या आणि आफ्रिकन खंडातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (रु. ३.२९ लाख कोटी) असलेल्या नायजेरियाची धोरणे ही येथील समाजाच्या उन्नतीसाठी पूरक आहे. विविध अडचणींचा सामना करत नायजेरिया शिक्षण, वैद्यकीय, ऑटोमोबाईल्स आणि अभियांत्रिकीसारख्या इतर क्षेत्रांत दैदीप्यमान कामगिरी बजावत आहे. ब्रिक्स परिषदेतील देश देखील वैचारिक दृष्ट्या नायजेरीयाशी बऱ्याच अंशी एकरूप आहेत. या आणि अनेक कारणांचा अभ्यास करूनच नायजेरियाला ब्रिक्समध्ये सामावून घेण्यात आले आहे, असे ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

BRICS: Nigeria Becomes a Partner Country - Powers of Africa 

नायजेरियाने ब्रिक्स देशांसोबत मिळून ग्लोबल साऊथला बळकट करण्यासाठी आणि जागतिक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी रशियातील कझान शहरात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत १३ देशांना भागीदार देशांचा दर्जा देण्यात आला होता. यापैकी आत्तापर्यंत ९ देश औपचारिकपणे त्याचे भागीदार देश बनले आहेत.


Nigeria admitted to BRICS as partner - The Tribune


नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्याची लोकसंख्या २२ कोटी आहे. हा देश सर्वाधिक वेगाने वाढणारी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. नायजेरियामध्ये तेल आणि वायूचे प्रचंड साठे आहेत, परंतु विविध जमातींमधील संघर्षामुळे येथील राजकीय वातावरण नेहमीच तंग असते. नायजेरिया दोन भागात विभागला गेला आहे. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या उत्तर भागात गरिबी जास्त आहे. दक्षिण आणि पूर्व भागात ख्रिश्चन लोकसंख्या अधिक आहे. हे क्षेत्र अधिक समृद्ध आहे.


Nigeria joins BRICS as partner, signaling shift in global ties


भारताचा आफ्रिकन देशांसोबतचा व्यापार वाढला आहे

सर्व आफ्रिकन देशांसोबतचा भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि आपली येथील गुंतवणूकही सातत्याने वाढत आहे. भारताला सातत्याने ऊर्जा पुरवठा होणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने त्याला उर्जेचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण अंगोला, नायजेरिया आणि सुदानमधूनही तेल आयात करतो. भारताच्या प्रयत्नांमुळे आफ्रिकन युनियन जी२० चे सदस्य बनले. ज्या मुद्द्यांवर जगाने त्यांच्याकडे दीर्घकाळ दुर्लक्षित केले होते त्या मुद्द्यांवर त्यांचा आवाज ऐकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल या दृष्टीने आफ्रिकन देश ब्रिक्सकडे  बघतात. 


230 million Nigeria gets BRICS partner status


मागेच भारताचे परराष्ट्रमंत्री एका परिषदेत सहभागी झाले होते. रशियाशी निगडीत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी आपल्या मुत्सद्दीपणाची झलक दाखवली. अमेरिका आणि युरोपमधील मुद्दे हे जागतिक मुद्दे म्हणत सर्वांना वेठीस धरत आपले हित साधताना इतर देशांच्या समस्यांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करणे युरोप आणि अमेरिकेने आता थांबवले पाहिजे असे त्यांनी म्हटले होते. जयशंकर आणि पर्यायाने भारताच्या कणखर भूमिकेचे यावेळी प्रचंड कौतुक झाले. आफ्रिकन युनियनच्या नेत्यांनी तेव्हा जयशंकर यांचे तोंड भरून कौतुकही केले होते.  एकूणच भारत, ब्रिक्स संघटनेतील इतर देश आणि नायजेरिया यांच्यात व्यापार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील उलाढाल येत्या काळात अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. 


India wants to grow with world: EAM Jaishankar


इंडोनेशिया १० वा स्थायी सदस्य देश बनला

७ जानेवारी रोजी, जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला.  ब्रिक्समध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा १०वा स्थायी सदस्य देश आहे. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने २०२३ मध्ये इराण, यूएई, इजिप्त आणि इथिओपियासह सौदी अरेबियामध्ये सामील होण्याची घोषणा केली होती. सौदी अरेबियाची ब्रिक्समध्ये सामील होण्याची प्रक्रिया फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणार होती परंतु शेवटच्या क्षणी सौदी अरेबियाने परिषदेत सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली. 


हेही वाचा