कारवार : अरेबैल घाटात भीषण दुर्घटना : ट्रक कलंडल्याने १० जण ठार तर, १६ जण गंभीर

सदर ट्रकमध्ये भाजी विक्रेते आपला माल घेऊन कुमटा येथील बाजारात जात होते. चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडली दुर्घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
कारवार : अरेबैल घाटात भीषण दुर्घटना : ट्रक कलंडल्याने १० जण ठार तर, १६ जण गंभीर

कारवार : जिल्ह्यातल्या यल्लापूर तालुक्यातील अरेबैल घाटात आज पहाटे एक मालवाहू ट्रक पलटी झाल्याने भीषण दुर्घटना घडली. सदर ट्रकमध्ये तब्बल ४० फळ आणि भाजी विक्रेते प्रवास करत होते. या दुर्घटनेत १० जणांवर मृत्यू ओढवला असून, १६ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.  दरम्यान जखमींना  यल्लापूर येथील सरकारी आरोग्य केंद्रात सध्या दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


हाती आलेल्या माहितीनुसार, हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथून ४० व्यापारी भाजीपाला आणि फळे भरून या ट्रकमधून कुमटा येथील बाजारात विक्रीसाठी जात होते. दरम्यान अरेबैल घाटात गुल्लापूर नजीक पोहोचल्यानंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक या ठिकाणी तत्काळ दाखल झाले व जखमींना आरोग्य केंद्रात दाखल केले. येत्या काळात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा