उद्योजक निखिल कामथ सोबतच्या त्यांच्या पहिल्यावहिल्या पॉडकास्टमध्ये मोदींनी मारल्या दिलखुलास गप्पा
नवी दिल्ली: जनतेशी संवाद साधण्याची संधी कधीही न सोडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पहिले पॉडकास्ट रेकॉर्ड केले आहे, जे आज शुक्रवारी रिलीज झाले आहे. पंतप्रधान मोदी भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर निखिल कामथ यांच्या 'पीपल बाय डब्ल्यूटीएफ' या पॉडकास्ट शोमध्ये पाहुणे असतील. कामथ सोबतच्या त्यांच्या पहिल्यावहिल्या पॉडकास्टमध्ये मोदींनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. निखिल कामथने रिलीज केलेल्या ट्रेलरमधून ही माहिती समोर आली आहे.
झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर प्रसिद्ध केलेल्या या पॉडकास्टच्या ट्रेलरमध्ये मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्री या नात्याने केलेल्या एका भाषणाचा उल्लेख केला. 'चुका प्रत्येकाकडून होतात, मी काही देव नाही, मी देखील काही चुका करू शकतो' असे ते या भाषणात म्हणाले होते.
हे पॉडकास्ट स्वतः कामथ यांनी होस्ट केले आहे. एका प्रश्नाचे उत्तर देताना मोदींनी भारतीय राजकारणात आता नव्या दमाच्या पिढीने यावे अशी आशा व्यक्त केली आहे. कोणत्याही वैयक्तिक अपेक्षा न बाळगता एका ध्येयाने त्या व्यक्तीने यावे आणि देशाची सेवा करावी असेही ते म्हणाले.
'मला आशा आहे की पॉडकास्ट बनवताना आम्हाला जितका आनंद झाला, तितकेच तुम्हालाही (प्रेक्षकांना) ते आवडेल' असे कामथ यांनी शेअर केलेल्या एका पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी कमेंट केली.
पहा ट्रेलर
पहा पूर्ण पॉडकास्ट :