महाराष्ट्र : युवकाने ऑफिस पार्किंगमध्ये महिला सहकाऱ्याची केली चाकूने भोसकून हत्या

वडिलांची प्रकृती बिघडल्याचा बहाणा करून सदर महिलेने युवकाकडून पैसे घेतले होते. यामुळेच वाद उद्भवला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th January, 12:14 pm
महाराष्ट्र : युवकाने ऑफिस पार्किंगमध्ये महिला सहकाऱ्याची केली चाकूने भोसकून हत्या

पुणे : पुण्यातील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणाने मंगळवारी कंपनीच्या पार्किंगमध्ये एका महिला सहकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी समोर आला. कृष्णा कनोजा (३०) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो येरवडा स्थित WNS ग्लोबल (एक बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग कंपनी) मध्ये अकाऊंटंटपदावर कार्यरत आहे.


आरोपी तरुण तरुणीजवळ चाकू घेऊन उभा आहे. बरेच लोक दूर उभे आहेत.


हाती आलेल्या महितीनुसार, त्याची महिला सहकारी शुभदा कोडारे (२८) हिने त्याच्याकडून वडिलांच्या प्रकृतीचा बहाणा करून अनेकवेळा पैसे घेतले होते. वडील आजारी आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून ती नेहमी आरोपीकडून पैसे घायची. अनेकदा कृष्णा कनोजाने तिच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला पण शुभदाने वडिलांच्या प्रकृतीच्या अस्वस्थाचे कारण देत पैसे देण्यास नकार दिला. दरम्यान एकदा कृष्णाने शुभदाच्या घरी जात तिच्या वडिलांची विचारपूस केली तेव्हा तिचे वडील एकदम ठणठणीत असल्याचे आढळून आले. 


तरुणीवर अनेक वेळा वार केल्यानंतर आरोपीने पार्किंगमध्येच चाकू फेकून दिला.


मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कृष्णा कनोजाने शुभदा कोदरेला कार्यालयातील पार्किंग एरियात बोलावून आपले पैसे परत मागितले. शुभदाने पैसे परत करण्यास नकार दिल्याने वाद झाला आणि चिडलेल्या कृष्णाने चाकूने वार करत तिचा खून केला. शुभदाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

हेही वाचा