नवीन वर्षांच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाचा खजिना
नवीन वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे ओटीटी आणि चित्रपटगृहात अनेक चित्रपट आज झळकणार आहे. ओटीटीवर अनेक हटके वेबसीरिज, चित्रपट पहायला मिळणार आहेत.
ऑल वी इमॅजिन एज लाईट । डिस्ने प्लस हॉटस्टार
२०२४ च्या कान्स फेस्टिवलमध्ये गाजलेला चित्रपट ‘ऑल वी इमॅजिन एज लाईट’ हा आता तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. या चित्रपटाची बरीच चर्चा होती.
गुनाह सिझन २ । डिस्ने प्लस हॉटस्टार
‘गुनाह’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. या सीरिजचा आता दुसरा सिझन येतो आहे. त्यातूनही ही सीरिज कधी एका प्रदर्शित होते आहे अशीही अनेकांना उत्सुकता लागून आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज पाहू शकता.
द रिग सिझन २ । अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ
‘द रिग’ ही सीरिजही प्रचंड गाजली होती. आता या सीरिजचा दुसरा सिझन हा प्रदर्शित होणार आहे. त्यातून तुम्हाला आता यातून अॅक्शन, थ्रिल पाहायला मिळणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर झळकली आहे.
व्हेन स्टार गॉसिप । नेटफ्लिक्स
‘व्हेन स्टार गॉसिप’ ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा सीरिज पाहू शकता. ही एक कोरियन सीरिज आहे. या तुम्हाला अंतराळ आणि त्यातील थरार पाहायला मिळेल. येत्या ४ जानेवारी पासून तुम्ही ही सीरिज पाहू शकता.
बँडीडोस सीझन २ - नेटफ्लिक्स
बँडीडोसचे निर्माते एका नवीन हंगामासह परत आले आहेत. हा हंगाम मिगेल मोरेल्स, हस्टलर आणि गटा भोवती फिरतो. जे माया नदीत खजिना शोधण्यासाठी एक नवीन मोहिमेवर निघाले आहेत.
सोनिक द हेजहॉग ३ । थिएटर
सोनिक द हेजहॉग ३ हा एक अॅनिमेटेड साहसी चित्रपट आहे. जो सोनिक भोवती फिरतो. जो टेल आणि नकलससोबत एकत्रित होऊन शॅडो द हेजहॉग आणि त्याचा सहयोगी शास्त्रज्ञ इवो आणि गेराल्ड रोबोटनिक यांना पृथ्वी नष्ट करण्यापासून रोखतात.
सेलिंग द सिटी । नेटफ्लिक्स
सेलिंग द सिटी ही एक रोमांचक रिअॅलिटी मालिका आहे, जी प्रतिभावान रियल इस्टेट एजंट्सच्या गटाची माहिती देते. जे न्यूयॉर्कमधील सर्वात महागड्या मालमत्ता विकण्यासाठी धावपळ करतात.