अर्थरंग : आता मिळणार पूर्वीपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा

ईएसआयसीशी जोडले गेलेल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th December, 03:19 pm
अर्थरंग : आता मिळणार पूर्वीपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा

नवी दिल्ली : एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अंतर्गत समाविष्ट असलेल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. या  कर्मचाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. इतकेच नाही तर आता कर्मचाऱ्यांना ईएसआयसी पोर्टल आणि ॲप वापरणे आणि सुविधांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. वास्तविक, कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा आणि सेवा देण्यासाठी ईएसआयसीने आपली आयटी प्रणाली अपग्रेड केली आहे.

ईएसआयसीने आपली आयटी प्रणाली अपग्रेड केल्यामुळे, हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेण्यापासून रिपोर्ट मिळवण्यापर्यंतच्या  सर्व ऑनलाइन सुविधा अधिक सुरक्षितपणे आणि सहज उपलब्ध होतील.  ईएसआयसी आपल्या सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे आणि देशभरातील रुग्णालयांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे आपल्या कव्हर केलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्य विमा आणि वैद्यकीय सुविधा पुरवते.

दरम्यान कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटल्यानुसार, ईएसआयसीने हार्डवेअर, मिडलवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क सिस्टमसह संपूर्ण आयटी प्रणाली अपग्रेड केली आहे. यामुळे ते जलद, अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपे झाले आहे. या नवीन प्रणालीमुळे कोणत्याही अडचणीशिवाय कर्मचाऱ्यांना आपले योगदान नोंदणी आणि जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. २२ डिसेंबर २०२४ रोजी प्रणाली अपग्रेड करण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे कामगार मंत्रालयाने सांगितले.

 आता ईएसआयसीचे मोबाईल ॲप अधिक सुविधा देण्यासाठी आणि वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि अधिक सोयीस्कर अनुभव देण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून हॉस्पिटलमधील 'अपॉइंटमेंट बुकिंग'मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सिस्टम अपग्रेड झाल्यावर, नियोक्ते, विमा उतरवलेले कर्मचारी आणि लाभार्थ्यांना कमी वेळेत प्रतिसाद मिळू शकतील.


हेही वाचा