पणजी : सावईवेरे येथील अनंत देवस्थानच्या तळीत बुडाल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुळशीदास दत्ता पालकर (सावईवेरे) असे या युवकाचे नाव आहे. येथील तळीत हा युवक मुलांना पोहायला शिकवायचा. नेहमीप्रमाणेच तळ्यात उतरून येथे जमलेल्या मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देत असताना तो अचानक पाण्यात बुडाला.
येथे उपस्थित असलेल्या लोकांनी धाव घेत त्यास पाण्यातून बाहेर काढले असता त्याची प्राणज्योत मावळल्याचे समोर आले. दरम्यान पाण्यात पोहत असताना त्यास हृदयविकाराचा झटका आला असावा असा प्राथमिक संशय वयात केला जात आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय ? याचा उलगडा शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच होईल असे येथे पंचनामा करण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातमी अपडेट होत आहे.