केपे : पारोडा येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक; एकजण ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th December, 03:18 pm
केपे : पारोडा येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक; एकजण ठार

पणजी : केपे तालुक्यातील पारोडा येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना एका दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक बसली. आज सकाळी ८:३० च्या सूमारास घडलेल्या  या अपघातात शिरवई-केपे येथील रोशन मुजावर (४१) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

हाती आलेल्या माहितीनुसार, मुजावर हे आपल्या जीए-०९-७९८० या दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या सरफराज मोहम्मद याच्या जीए-एपी-११६५ या दुचाकीसोबत धडक झाली. सरफराजने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने  हा अपघात घडला व रोशन मुजावर यांना आपला जीव गमवावा लागला. 

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच केपे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी योग्य कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपासाला गती देण्यात आली आहे.  


हेही वाचा