सत्तरी :पाटवळ येथे शिकारीसाठी गेलेल्या एकाचा गोळी लागून मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th December, 02:49 pm
सत्तरी :पाटवळ येथे शिकारीसाठी गेलेल्या एकाचा गोळी लागून मृत्यू

पणजी : सत्तरी तालुक्यातील पाटवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील जंगलात रानटी जनावरांच्या शिकारीसाठी गेलेल्या एकाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. समद खान ( नानूस-सत्तरी )असे या व्यक्तीचे णाव आहे. 

सद्यघडीस समोर आलेल्या माहितीनुसार, तिघे जण रानटी जनावरांच्या शिकारीसाठी येथील जंगलात गेले होते. येथेच समद खान यांना गोली लागली व ते मरण पावले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले व त्यांनी समद खान यांच्या सोबत असलेल्या अन्य दोघांना ताब्यात घेतले. समद खान यांना गोळी नेमकी कशी लागली याचा उलगडा होत नसल्याने सदर ठिकाणी फॉरेन्सिक पथकास देखील पाचारण करण्यात आले आहे.  दरम्यान वाळपई पोलीस स्थानकात समद खान यांच्या नातेवाइकांनी व मित्रपरिवाराने गर्दी केली आहे. समद यांचा मृतदेह सद्यघडीस  गोमेकॉत शवविच्छेदना पाठवण्यात आला आहे. 

मागेच एप्रिल महिन्यात केपे तालुक्यात अशीच दुर्घटना घडली होती. केपे- काणकोणच्या सिमेवरील पर्येमळ - खोला येथे ७ एप्रिल रोजी माटवेकारांच्या देवाच्या पारंपरिक भोंवडीच्या वेळी रान डुकराने चकवा दिल्यामुळे भोंवंडीत सहभागी एका व्यक्तीला बंदुकीची गोळी लागल्यामुळे प्राण गमवावा लागला. 

 खुशाली वेळीप इतर स्थानिकांसोबत पाडी जंगलात भोंवंडीला गेले असता, त्यांना रानडुक्कर दिसले होते . शिकार करायच्या इराद्याने वेळीप यांनी त्याच्यामागे धाव घेतली. दरम्यान, या भोंवडीत सामील असलेले इतर लोकही डुकराच्या मागे लागले. इतक्यात समोर डुकर असल्याचे समजून लोकांमधीलच एकाने बंदुकीचा नेम धरून गोळी झाडली. यात गोळी खुशाली यांना लागून ते जायबंदी झाले होते. घटना घडल्यानंतर खुशाली वेळीप यांना  रात्री ११ वाजता मडगावमधील एका इस्पितळात नेण्यात आले होते पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 


हेही वाचा