हळदोण्यातील शाळेतील प्रकार
म्हापसा : हळदोणा येथील एका १२ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शाळेत सदर विद्यार्थ्याला मारहाण झाल्यानंतर म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत उपचार करण्यात आले. संशयित शिक्षिकेने या मुलाच्या कानशिलात लगावली होती.
याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापन तसेच म्हापसा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित शिक्षिकेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२) व गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.