सासष्टी। नौदलात नोकरीचे आमिष; १६ लाखांची फसवणूक

मडगाव पोलिसांकडून दोघा महिलांना अटक


14th November, 11:59 pm
सासष्टी। नौदलात नोकरीचे आमिष; १६ लाखांची फसवणूक

मडगाव : नौदलात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २०२० मध्ये १६ लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी विषया गावडे व सोनिया आचारी या दोघा महिलांना मडगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली.      

नागमोडे नावेली येथील रहिवासी सुनील बोरकर यांनी मडगाव पोलिसांत तक्रार नोंद केली. संशयित विषया विष्णू गावडे (५३, रा. सां जुझे दी अरियाल) व सोनिया ऊर्फ रोशन सोमनाथ आचारी (५३, रा. सध्या कोलमोरोड. मूळ आचारीवाडा, सदाशिवगड, कारवार) यांनी बोरकर यांच्या भावाला नौदलात अधिकारी पदावरील नोकरी देण्याचे आमिष दाखवत पैसे मागितले होते. २०२० मध्ये २० जानेवारी व ३० जून अशा दोनवेळा मडगावात १६,१२,५०० रुपये त्यांनी अदा केले. मात्र त्यांनी यांना नोकरी दिली नाही व फसवणूक केली.  पोलीस उपनिरीक्षक शुभम गावकर पुढील तपास करत आहेत. 

तक्रारीची गंभीर दखल

मडगाव पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. मडगाव पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी तपास करत दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली.