वासराला वाचविण्याच्या नादात तीन वाहनांचा अपघात

फोंडा पोलिसांनी केला अपघाताचा पंचनामा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November, 12:39 am
वासराला वाचविण्याच्या नादात तीन वाहनांचा अपघात

फोंडाः पेटके -धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गावर वासराला वाचविण्याच्या नादात रिक्षा, जीप व कारची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात वासराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. 

प्राप्त माहितीनुसार बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास केए-६३-ए- ११२४ क्रमांकाची रिक्षा मोलेच्या दिशेने जात होती. अचानक रस्त्यावर आलेल्या वासराला वाचाविण्याचा प्रयत्न रिक्षा चालकाने केला. 

पण रिक्षाची धडक बसून वासराचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी रिक्षेमागून येणाऱ्या केए-२५-एसी- ०६५६ क्रमांकाच्या जीपने अचानक ब्रेक लावल्याने त्याच दिशेने धावणाऱ्या जीए -०५-डी -१०४२ क्रमांकाच्या कारची धडक जीपला बसली. यात कारचे मोठे नुकसान झाले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला आहे.        

हेही वाचा