फोंडा : पेटके धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गावर वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा, जीप व कारची टक्कर झाली. या अपघातात वासराचा मृत्यू झाला. सदर अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९:३० च्या सुमारास केए-६३-ए- ११२४ क्रमांकाची रिक्षा मोलेच्या दिशेने जात होती. यावेळी अचानक रस्त्यावर आलेल्या वासराला वाचवण्यासाठी रिक्षा चालकाने प्रयत्न केले, मात्र तरीही रिक्षाच्या धडकेत वासराचा जीव गेला. दरम्यान रिक्षेच्या मागे असलेल्या केए-२५-एसी- ०६५६ क्रमांकाच्या जीपने अचानक ब्रेक लावल्याने जीपच्या मागे असलेल्या कारची धडक जीपला बसली. यात कारचे मोठे नुकसान झाले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला.