फोंडा : दोन मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक; एकजण गंभीर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th November 2024, 03:58 pm
फोंडा : दोन मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक; एकजण गंभीर

फोंडा:  दुर्गीणी - धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने गवी सिद्धया (कर्नाटक) हा चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकावर गोमेकॉत उपचार सुरु आहे. कुळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

 समोर आलेल्या माहितीनुसार केए - ३७ -बी -५५८६ क्रमांकाचा ट्रक कर्नाटक राज्यातून फोंडा येथे जात होता. दुर्गीणी पोहचताच चालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रकची धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या केए - २२- सी - १२८७ क्रमांकाच्या ट्रकला बसली. यात कर्नाटक मधून गोव्यात प्रवेश केलेला ट्रकचा चालक जखमी झाला. ट्रकच्या कॅबिन मध्ये अडकून पडलेल्या चालकाला रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी बाहेर काढून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर अधिक उपाचारासाठी त्याला रात्री उशिरा गोमेकॉत दाखल करण्यात आले. कुळे पोलिसांनी अपघातस्थळी जात अपघाताचा पंचनामा केला.

हेही वाचा