डिचोली : तालुक्याला पावसाने झोडपले; मयेत घरावर कोसळले झाड

घरातील एकजण दुखापतग्रस्त तर घराची तीन लाखांची हानी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31st October 2024, 11:47 pm
डिचोली :  तालुक्याला पावसाने झोडपले; मयेत घरावर कोसळले झाड

डिचोली : तालुक्याला गुरुवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. देवूस भटवाडी मये येथे अश्वेक कारबोटकर यांच्या घरावर झाड पडून सुमारे तीन लाखांची हानी झाली. ही घटना घडली तेव्हा सर्वजण घरात होते. यात घरातील एका सदस्याला किरकोळ दुखापत झाली. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत हे झाड हटवले. 


वादळीवारा, विजेचा कडकडाट सायंकाळी सहा तास सुरूच होता. अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी डिचोलीच्या अंतर्गत भागांतील रस्त्यांवर पडलेली झाडे बाजूला करत रस्ते मोकळे केले. डिचोली शहरातील राधाकृष्ण विद्यालयाच्या परिसरात असलेली संरक्षण भिंत कोसळली. 



हेही वाचा