मध्यपूर्व आशिया : नईम कासिम हिजबुल्लाहच्या प्रमुखपदी नियुक्त

नसराल्लाहच्या मृत्यूनंतर ३२ दिवसांनी इराणच्या शीर्ष नेतृत्त्वाने घेतला निर्णय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th October 2024, 10:06 am
मध्यपूर्व आशिया : नईम कासिम हिजबुल्लाहच्या प्रमुखपदी नियुक्त

बेरूत : इस्रायलच्या हल्ल्यात हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर ३२  दिवसांनी हिजबुल्लाने नवीन प्रमुखाची घोषणा केली आहे. नईम कासिम याच्याकडे मंगळवारी संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली. हिजबुल्लाहने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासिम यांनी नेहमीच संघटनेच्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत कासिम संघटनेत दुसऱ्या क्रमांकावर होता. नसराल्लाहच्या मृत्यूनंतर, कासिमनेच लेबनॉनच्या लोकांना संबोधित केले. यूएई मीडिया हाऊस इरेम न्यूजनुसार, तो इराणमध्ये राहतो.

नसराल्लाहच्या मृत्यूनंतर, कासिम रेकॉर्ड केलेल्या भाषणांद्वारे लेबनीज जनतेला संबोधित करत आहे. - दैनिक भास्कर


५ ऑक्टोबर रोजी कासिमला इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विमानात नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या नेत्यांनी इस्रायलच्या भीतीने कासिमला बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. नईमच्या आधी नसराल्लाहचा चुलत भाऊ हाशेम सैफिद्दीनचे नाव हिजबुल्लाचा प्रमुख बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तोही मारला गेला. खुद्द इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला.



नईम कासिम कासिम यांचा जन्म १९५३ मध्ये लेबनॉनच्या काफर किला गावात झाला. १९७०  च्या दशकात, कासिम लेबनॉनमधील शिया अमल चळवळीचा भाग बनला. शियांच्या हक्कांसाठी लढणे हे अमलचे काम होते. कासिम नंतर १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस हिजबुल्लाह चळवळीत सामील झाला आणि संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. कासिम अनेक दशकांपासून बेरूतमध्ये धार्मिक शिक्षण देत आहे. कासिम १९९१ मध्ये हिजबुल्लाहचा उपमहासचिव झाला. तो हिजबुल्लाहच्या सुरा कौन्सिलचा सदस्यही आहे.


Israel-Hezbollah timeline: 12 days that transformed a bloody conflict : NPR

हेही वाचा