पेडणेः मांद्रेत अखिल गोवा घुमट महासंग्रामाचे आयोजन

स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
पेडणेः मांद्रेत अखिल गोवा घुमट महासंग्रामाचे आयोजन

पेडणे : श्री ओंकार थिएटर पेडणे आणि जय गणेश घुमट आरती मंडळ मांद्रे तर्फे अखिल गोवा घुमट महासंग्राम स्पर्धा शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री देवी भूमिका देवालय सावंतवाडा मांद्रे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेमध्ये ओम शिव शंभो संगीत विद्यालय मेराशी, मोरेश्वर घुमट आरती मंडळ मुळगाव, श्री सिद्धीविनायक लय राई आरती मंडळ कुचेली, श्री शिव भूमिका घुमट आरती मंडळ साळ- डिचोली, श्री लईराई सातेरी आरती मंडळ शिरगाव, श्री हनुमान पुरमारेश्वर घुमट आरती मंडळ पीर्ण, ओम कला घुमट आरती मंडळ हलर्ण, साई महालसा आरती मंडळ म्हार्दोळ, सातेरी केळबाई सातेरी आरती मंडळ कुट्टी, श्री सातेरी घुमट आरती मंडळ, श्री नवसाई आरती मंडळ बोरी आणि श्री साखळेश्वर सांस्कृतिक घुमट आरती मंडळ नेरूळ, या निमंत्रित घुमट आरती मंडळाची स्पर्धा होणार आहे. 

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु. २२,२२२ दुसरे बक्षीस रु. १६,६६६ तिसरे बक्षीस रु. ११,१११ उत्तेजनार्थ पहिले रु. ६,६६६ दुसरे उत्तेजनार्थ रु.५,५५५ तिसरे उत्तेजनार्थ रु. ४,४४४ शिवाय उत्कृष्ट समेळ वादन रु. २२२२, उत्कृष्ट कासाळे वादक रु. २२२२, उत्कृष्ट घुमट वादक रु. २२२२, उत्कृष्ट गायक रु २२२२ अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला श्री भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच अॅड. अमित सावंत, हसापूर सरपंच तुळशीदास गावस, पत्रकार किशोर नाईक गावकर, सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक नारायण उर्फ नाना आसोलकर, हार्मोनियम वादक राजीव काशिनाथ बर्वे, तबलावादक रोहिदास कृष्णा परब, नाट्यकलाकार अनिल मनोहर आसोलकर, घुमट आरती गायक शुभम नाईक, जय गणेश घुमट आरती मंडळाचे अध्यक्ष अनिश उमेश सावंत, सखाराम विष्णू सावंत, आदी उपस्थित असणार आहे. 

या स्पर्धेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओंकार थेटरचे अॅड. अमित सावंत यांनी केले आहे.             

हेही वाचा