मुरगाव : भूतानी प्रकरणी सांकवाळ पंचायत घेणार कायदेशीर सल्ला

बैठक पूर्ण झाली नसल्याचा विरोधी पंचांचा दावा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
मुरगाव : भूतानी प्रकरणी सांकवाळ पंचायत घेणार कायदेशीर सल्ला

पणजी : कारणे दाखवा नोटिसीला भूतानीकडून मिळालेल्या उत्तरावर सांकवाळ पंचायत कायदेशील सल्ला घेणार आहे. सांकवाळ पंचायतीतर्फे भूतानीच्या प्रकल्पासंदर्भात घेतलेल्या बैठकीत आरोप प्रत्यारोपांमुळे बराच गदारोळ झाला. दरम्यान सत्ताधारी पंच व सचिवाने गोंधळामुळे बैठकीतून काढता पाय घेतला.

उपसरपंच डेरीक वालीस यांच्या अध्यक्षपदाखाली बैठक झाली. शेवटी भूतानीच्या नोटीशीवर चर्चा झाली. गदारोळ झाल्याने सत्ताधारी गटाचे पंच उठून गेले, अशी माहिती विरोधी गटातील पंचानी दिली. बैठकीसाठीचा कोरम पूर्ण झाला नसल्याने बैठक झाली नसल्याचा दावा विरोधी पंचांनी केला.

भूतानी इन्फ्रातर्फे परमेश कन्स्ट्रक्शनने पंचांनी पैशांची मागणी केल्याचेही नमुद केले आहे. पंचायत, पीडीए कडून परवाना प्राप्त झाल्याने प्रकल्प कायदेशीर असल्याचा दावा उत्तरात करण्यात आला आहे. कंपनीने नगरनियोजन कायद्यातील कलम १७ ए नुसार डोंगर कापणीसाठीचा परवाना घेणे आवश्यक होते. हा परवाना घेण्यात आलेला नाही. परवान्यासाठी अर्ज केला असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी पर्यावरणी दाखला घेण्यात आलेला नाही. असे असतानाही पंचायतीने कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा