अमेरिका : गुरपतवंत पन्नू हत्येचा कट: माजी रॉ अधिकाऱ्याचा एफबीआयच्या 'वॉन्टेड' यादीत समावेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
अमेरिका : गुरपतवंत पन्नू हत्येचा कट: माजी रॉ अधिकाऱ्याचा एफबीआयच्या 'वॉन्टेड' यादीत समावेश

वॉशिंग्टन : अमेरिकन गुप्तचर संस्था FBI ने माजी RAW अधिकारी विकास यादव यांच्यावर अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  याप्रकरणी आता एफबीआयने विकास यादव यांचे नाव 'वॉन्टेड' यादीत समाविष्ट केले आहे. यासोबतच या अधिकाऱ्यांचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

Who is Vikash Yadav, ex-Indian govt worker on US' most wanted list - The  Economic Times

रॉचे माजी अधिकारी विकास यादव याने पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असतानाच पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा दावाही केला जात आहे.  

Vikash Yadav Charged in US for Plot to Kill Gurpatwant Singh Pannun | India  News - Times of India

गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी विकास यादव यांच्यावर हत्येचा कॉंट्रॅक्ट घेतल्याचा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. अमेरिकन न्याय विभागाने (यूएस कायदा विभाग) या प्रकरणी १८  पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. विकास यादवच्या नावाचा आरोपपत्रात 'सीसी-1' (CO-CONSPIRATOR) असा उल्लेख आहे. या प्रकरणी विकास यादवचा सहकारी निखिल गुप्ता याला चेक रिपब्लिकमधून अटक करण्यात आली आहे. नंतर त्याचे झेक प्रजासत्ताकातून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. सध्या निखिल गुप्ता अमेरिकन तुरुंगात आहे.


Ex-RAW Official Vikas Yadav Wanted by FBI in Plot to Murder Khalistani  Terrorist Gurpatwant Singh Pannun

एफबीआयने मागे १० ऑक्टोबर रोजी विकास यादवविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. यानंतर एफबीआयने विकासच्या तीन छायाचित्रांसह 'वॉन्टेड' पोस्टरही जारी केले आहे. विकास यादव यांना "विकास" आणि "अमानत" या नावांनी देखील ओळखले जाते. विकास यादव यांचे वर्णन 'वरिष्ठ क्षेत्र अधिकारी' म्हणून केले आहे. त्यांनी यापूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट म्हणूनही काम केले होते.

विकास यादव आणि निखिल गुप्ता यांनी २०२३ च्या उन्हाळ्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नूच्या हत्येचा कट रचला होता, असे अमेरिकन कोर्टाने गंभीर आरोप केले होते . पन्नूच्या हत्येसाठी एका व्यक्तीला १ लाख अमेरिकन डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती. याशिवाय, त्या व्यक्तीला १५ हजार अमेरिकन कोलर्सची आगाऊ रक्कम देखील देण्यात आली होती. दरम्यान हा माणूस एफबीआयचा खबऱ्या असल्याचे निष्पन्न झाले, यामुळे हा संपूर्ण कट अयशस्वी झाला.

या प्रकरणी भारत सरकारची भूमिका काय आहे? 

भारताकडून अमेरिकन अधिकाऱ्यांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासोबतच भारताने या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही सुरू केली आहे. भारताकडून होत असलेल्या मदतीबद्दल अमेरिकेनेही समाधान व्यक्त केले आहे. नुकतेच भारताचे एक तपास पथकही अमेरिकेत पोहोचले. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये बैठक झाली. या बैठकीत एफबीआय, यूएस कायदा विभाग आणि यूएस स्टेट डिपार्टमेंटचे अधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा