ब्राजील :वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी महिला बनली पोलीस;२५ वर्षानंतर केली मारेकऱ्यास अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
ब्राजील :वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी महिला बनली पोलीस;२५ वर्षानंतर केली मारेकऱ्यास अटक

रिओ दि जानेरो : कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी कुटुंबाची कर्ती व्यक्ती कोणत्याही थराला जाण्यास मागे पुढे पाहत नाही. २५ वर्षांपूर्वी आपल्या डोळ्यादेखत झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक महिला चक्क पोलीस अधिकारी बनली. इतकेच नव्हे तर अनेक प्रकरणांचा खोलवर  तपास करून वडिलांच्या मारेकऱ्याला पकडले देखील. कोणत्याही 'बदले की आग' छाप चित्रपटाला हे कथानक साजेसे आहे असे तुम्हाला सुरुवातीला वाटलेच असेल. ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. तेही भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्राजीलच्या ओ दि जानेरो शहरात. 


Woman becomes police officer to catch father's killer - Thaiger World

माहितीनुसार;  गिस्लेन सिल्वा डी ड्यूस या महिला पोलीस अधिकारी अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा वडिलांचा अवघ्या २० पाउंडसाठी गोळी झाडून खून करण्यात आला होता. घटनेच्या वेळी त्यांचे वडील आपल्या मित्रांसह आपल्याच क्लबमध्ये 'पूल' खेळत होते. दरम्यान येथे आलेल्या  रौमुंडो अल्वेस गोम्स नावाच्या एका व्यक्तीने गिस्लेनच्या वडिलांकडे पैशांची मागणी केली. दरम्यान  गिस्लेनचे वडील जिराल्डी व्हिसेन्टे सिल्वा डी ड्यूस यांनी त्यास तेथून जण्यास सांगितले. यावेळी गोम्स याने गोळ्या झाडत  जिराल्डी व्हिसेन्टेचा जीव घेतला. सदर घटना १९९९ साली घडली होती. 


Gislayne Silva de Deus became a cop to catch dad's killer 25 years later


२००९  गोम्सवर जिराल्डी व्हिसेन्टे सिल्वा डी ड्यूसची हत्या केल्याप्रकरणी  खटला चालवला गेला. २०१३ साली त्याला १२ वर्षांचा तुरुंगवास झाला. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात त्याने अपील केले व त्याचा तुरुंगवास टळला. पण २०१६ साली चौकशी पुन्हा सुरू झाली. त्याचे अपील फेटाळण्यात आले व अटक वॉरेंट जारी झाले. यावेळी तो भूमिगत झाला. 

Woman whose dad was shot dead when she was nine becomes a cop to avenge him  - and arrests the killer herself 25 years later after hunting him down |  Daily Mail Online


बदला घेण्याच्या भावनेने झपाटलेल्या  गिस्लेनने तब्बल १८ वर्षे कायद्याचा अभ्यास केला होता. दरम्यान गिस्लेन सिल्वा डी ड्यूस यांनी अथक परिश्रमातून आपले शिक्षण पूर्ण करत पोलीस अधिकारी बणण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या डोळ्यासमोर आता एकच ध्येय होते 'वडिलांच्या हत्येचा बदला'. पोलीस अधिकारी बनताच गिस्लेन सिल्वा कामाला लागल्या. त्यांनी अवघ्या ५ वर्षांत वरिष्ठ पोलीस अधिकारी बनण्यापर्यंत मजल मारली.  यादरम्यान त्या गोम्सचा शोध घेतच होत्या =. जनरल होमिसाईड डिव्हिजनमध्ये काम करत असताना मिळालेल्या एका गोपनीय टीपच्या आधारे त्यांनी अल्वेस गोम्सचा मागोवा घेण्याचे काम केले. शेवटी  बोआ व्हिस्टा जवळील नोव्हा सिडेड भागात एका फार्म हाऊसमध्ये लपून बसलेल्या गोम्सला  शोधून काढण्यात आले.  २५ सप्टेंबर रोजी त्यास अटक केली. 


Gislayne Silva de Deus became a cop to catch dad's killer 25 years later


गिस्लेनने आपला बदला पूर्ण केला. 'माझ्या वडिलांच्या जाण्याने मी जे गमावले त्याचे वर्णन शब्दांत करू शकत नाही. आजही वडील हयात नसल्याची वेदना जाणवते. मात्र त्याच्या मारेकऱ्याला कायद्याच्या चौकटीत स्वतच्या हाताने उभे करतांना मनाला छोटा का होईना दिलासा मिळाला आहे' अशी भावना गिस्लेनने माध्यमांसमोर व्यक्त केली. गोम्सची शिक्षा २६ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायाधीशांनी कायम ठेवली आणि त्याला १२ वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले.


Gislayne Silva de Deus became a cop to catch dad's killer 25 years later


हेही वाचा