काणकोणः वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सौर ऊर्जेचा वापरच आवश्यक! तवडकर

संजय देसाईच्या सौर उर्जा प्रकल्पाचे काणकोणात उदघाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
काणकोणः वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सौर ऊर्जेचा वापरच आवश्यक! तवडकर

काणकोणः गोवा राज्य वीज निर्मितीच्या बाबतील अन्य राज्यांवर अवलंबून आहे. केंद्र आणि गोवा सरकार सौर ऊर्जेला आता प्राधान्य देत आहे. वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून घ्यायला हवा असे आवाहन सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी केले. 

शेळेर काणकोण येथे सौरशक्ती ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर सभापती तवडकर बोलत होते. संजय देसाई यांनी काणकोण तालुक्यातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला सुरूवात केली आहे. 

या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला काणकोणच्या नगराध्यक्षा सारा देसाई, स्थानिक नगरसेविका सुप्रिया नाईक गावकर, धीरज गावकर, देसाई यांच्या मातोश्री, आणि अन्य परिवार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

धडपडणारी मुलेच यशाचे शिखर गाठत असतात असे सांगून गोवा, कारवार आणि सावंतवाडी या भागापर्यंत आपल्या या प्रकल्पाचा लाभ आपण करून देणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. 

या प्रकल्पाचे उद्घाटन सभापती तवडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले. यानिमित्त तयार करण्यात आलेली माहिती पत्रिका त्याचप्रमाणे वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सारा देसाई, नगरसेविका सुप्रिया देसाई, शांताजी नाईक गावकर यांनी आपले विचार मांडले व देसाई यांना शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. एस. कोमरपंत यांनी केले. सपना देसाई, संस्कृती देसाई, सुजय देसाई यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. वैभव राजा नाईक यांनी आभार मानले.            

हेही वाचा