पणजी : सुभाष वेलिंगकर यांनी 'गोयंच्या साहेबा'संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ख्रिस्ती बांधव क्षुब्ध आहेत. शनिवारी दक्षिण गोव्यात वातावरण किंचित तापले, पण रविवार दुपारीपर्यंत तेथील आंदोलकांनी माघार घेतली. मात्र वेलिंगकरांना अटक व्हावी ही मागणी अजूनही आहेच. दरम्यान चर्चने देखील समाजात एकोपा नांदावा यासाठी शांतता राखावी असे निवेदन केले. त्या अनुषंगाने आज सोमवारी कोणताही गोंधळ पाहण्यात आला नाही. दरम्यान याप्रकरणी आज सायंकाळी पाच वाजता यावर उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान आज सकाळी वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. यावेळी वेलिंगकरांच्या वकिलाने, 'वेलिंगकर तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. लोकांच्या दबावाखाली त्यांना पोलीस अटक करतील. ही लोकशाही नाही झुंडशाही आहे असे म्हटले. त्यांनी काही गुन्हा केला नाही तर डीएनए टेस्ट करावी ही केवळ मागणी असल्याचे ते म्हणाले. प्रतिवादी पक्षाच्या वकिलांनी 'वेलिंगकर हे वादग्रस्त वक्तव्य करून गोव्याचा सलोखा बिघडवण्याचे काम करतात.' असा युक्तिवाद केला. दरम्यान डिचोली पोलिसांनीही वेलिंगकर यांना जामीन नाकारण्यात यावा असा युक्तिवाद केला.
दरम्यान आपच्या क्रूझ सिल्वा यांनी या प्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यांचे वकील अमित पालयेकर यांनी युक्तिवाद करतांना ' जो पर्यंत सेंट फ्रांसईस झेवियर यांच्या पार्थिव प्रदर्शन सोहळा पार पडत नाही तो पर्यंत वेलिंगकरांना जूने गोवे येथे येण्यास मज्जाव करावा किंवा तडीपार करावे असे म्हटले आहे.
वेलिंगकर तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. लोकांच्या दबावाखाली त्यांना पोलीस अटक करतील. ही लोकशाही नाही झुंडशाही आहे : सुभाष वेलिंगकर यांचे वकील
बातमी अपडेट होत आहे