पणजी : सुभाष वेलिंगकर यांनी 'गोयंच्या साहेबा'संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ख्रिस्ती बांधव क्षुब्ध आहेत. शनिवारी दकाहसीन गोव्यात वातावरण किंचित तापले, पण रविवार दुपारीपर्यंत तेथील आंदोलकांनी माघार घेतली. मात्र वेलिंगकरांना अटक व्हावी ही मागणी अजूनही आहेच. दरम्यान चर्चणे देखील ससमाजात एकोपा नांदावा यासाठी शांतता राखावी असे निवेदन केले. त्या अनुषंगाने आज सोमवारी कोणताही गोंधळ पाहण्यात आला नाही.
दरम्यान विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी यावर भाष्य केले आहे. गोमंतकीयांनी भाजप-आरएसएसचा जातीय तेढ निर्माण करणारा ब्लूप्रिंट हाणून पाडला असे ते म्हणाले. ही परिस्थिती योग्य रीतीने हाताळल्याबद्दल त्यांनी गोमंतकीयांचे आभारदेखील मानले.
राज्यातील इतर ज्वलंत विषयांना देखील त्यांनी हात घातला. प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचार, जमिनीचे व्यवहार, जमीन रूपांतरण, म्हादई आणि जनतेला अंधारात ठेवत लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे जनतेला कळले आहे. भाजपने आपला जनाधार गमावला आहे. पण समाजात फुट पाडण्यात त्यांना यक्ष मिळणार नाही असेही ते म्हणाले.
विधानसभेत मणिपूरच्या संवेदनशील विषयावर आमदारांना बोलू दिले नाही. योग्य चर्चा झाली असती तर सरकारचे बिंग फुटले असते. म्हणूनच सभापती रमेश तवडकर यांनी विरोधकांना गप्प केले. वेलिंगकरांच्या वक्तव्याने सर्वांना वेदना झाल्या असून, सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या पार्थिव अवशेषांचा प्रदर्शन सोहळा जवळ आला की वेलिंगकर असेच काही तरी करतात असे युरी म्हणाले. भाजपच्या दडपशाहीला न जुमानता पोलिसांनी वेलिंगकरांना अटक करावी असे युरी म्हणाले.