मालवणी सुक्का चिकन

Story: चमचमीत रविवार |
06th October, 04:23 am
मालवणी सुक्का चिकन

साहित्य :

५०० ग्रॅम चिकन. मॅरिनेट करण्यासाठी मसाला : अर्धा इंच आलं, १०-१२ लसूण पाकळ्या, १/२ कप, कोथिंबीर, १/२ टीस्पून हळद , १/४ टीस्पून गरम मसाला.

रश्याच्या वाटणासाठी मसाला : १ मध्यम कांदा उभा चिरून, १/२ कप सुकं खोबरं, २ टीस्पून धणे, १/४ टीस्पून शहाजिरे, ८-१० मिरी, ४ लवंग, १ वेलची, दोन इंच दालचिनी तुकडे, १ मध्यम कांदा बारीक चिरून, १/२ कप टोमॅटो प्युरी, २ चमचे  लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे. थोडी ओली कोथिंबीर बारीक चिरून.

कृती :  

आले-लसूण, कोथिंबीर मिक्सरवर बारीक वाटून घ्या. चिकनला ही वाटलेली पेस्ट, हळद, गरम मसाला आणि मीठ लावून फ्रीजमध्ये ४-५ तास मॅरिनेट करून ठेवा. पातेल्यात १ चमचा तेलात उभा चिरलेला कांदा, धणे, शहाजिरे, मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलची परता. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या. पातेल्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या. २ चमचे लाल तिखट घाला. मॅरिनेट केलेले चिकन घालून परता. त्यात १ कप पाणी घाला. १०-१५ मिनिटे चिकन चांगले शिजू द्या. चिकन शिजले की नंतर टोमॅटो प्युरी घाला. वाटण घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या. गरज असेल तर आणखीन मीठ घालून एक वाफ येऊ द्यावी. चिकन शिजल्यावर वरून हिरवी कोथिंबीर घालावी.


कविता आमोणकर