‘द बकिंगहॅम मर्डर्स’मध्ये करीना प्रथमच गुप्तहेराच्या भूमिकेत
क्राइम थ्रिलर सेक्टर ३६ ते बर्लिनपर्यंत, शुक्रवारी आेटीटीवर रोमांचक आणि मनोरंजक चित्रपट आणि मालिका झळकणार आहे. तसेच करीना कपूरचा थ्रिलर, हंसल मेहता दिग्दर्शित, द बकिंगहॅम मर्डर्स, चित्रपटगृहात दाखल होत आहे. त्यामुळे सिनेरसिकांसाठी हा आठवडा पर्वणी ठरणार आहे.
द बकिंगहॅम मर्डर्स - थिएटर
करीना कपूर खान अभिनीत, द बकिंगहॅम मर्डर्स जसमीत भामराच्या (करीना कपूर) जीवनावर आधारित आहे, जी एक ब्रिटीश-भारतीय गुप्तहेर असून ती स्वत: संकटांचा सामना करत एक गुंतागुंतीचे हत्या प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करते. करीना कपूर या चित्रपटात प्रथमच एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.
ट्रॅप (बुक माय शो स्ट्रिमिंग)
ओटीटी रिलिजमध्ये जोश हार्टनेट, एरियल डोनोघ्यू आणि साल्का नाईट श्यामलन अभिनीत, हा सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपट बाप-मुलीच्या जोडीभोवती फिरतो. जे एकत्र पॉप कॉन्सर्टला जाण्याचा निर्णय घेतात आणि एका भयंकर कटात अडकतात.
बर्लिन (झी ५)
बर्लिन, ही एका सांकेतिक भाषा तज्ज्ञाची कथा आहे. ज्याचे जीवन उलथापालथ होते, जेव्हा सरकारी अधिकारी त्याला एका मूकबधिर आणि परकीय गुप्तहेर असल्याचा आरोप असलेल्या एका केसचे निराकरण करण्यासाठी नियुक्त करतात. अपारशक्ती खुराना, इश्वाक सिंग, राहुल बोस आणि अनुप्रिया गोयंका अभिनीत हा चित्रपट आपल्याला अखेरपर्यंत स्क्रिनवर खिळवून ठेवतो.
लेट नाईट विथ द डेव्हिल (लायन्सगेट प्ले)
हा भयपट चित्रपट एका टॉक शो होस्टभोवती फिरतो. जो त्याच्या शोचे रेटिंग वाढवण्याच्या प्रयत्नात एका प्राचीन दुष्ट आत्म्याला बाहेर काढतो आणि त्याच्यासोबत इतरांचेही जीवन संकटात सापडते.
बाळू गनी टॉकीज (आहा)
बाळू गनी टॉकीज ही एक तेलुगू मालिका आहे, जी एका तरुणाच्या जीवनावर आधारित आहे. ज्याला त्याच्या वडिलांच्या सिंगल-स्क्रीन थिएटरचा वारसा मिळाला आहे. ते पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात, तो प्रौढ चित्रपट एकाच स्क्रीनवर प्रवाहित करण्याचा निर्णय घेतो, ज्यामुळे तो गंभीर संकटात सापडतो. या मालिकेतील कलाकारांमध्ये शिवा राम चंद्रावरपू, सरन्या शर्मा, रघु कुंचे, सुधाकर रेड्डी आणि वामशी नेकांती यांचा समावेश आहे.
ऑफिसर ब्लॅक बेल्ट (नेटफ्लिक्स)
सेक्टर ३६, बर्लिन आणि इतर नवीन ओटीटी रिलीज व्यतिरिक्त, शुक्रवारी झळकणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये ऑफिसर ब्लॅक बेल्टचा देखील समावेश आहे. हा कोरियन चित्रपट एका कुशल मार्शल आर्टिस्टभोवती फिरतो. जो शहरातील गुन्हेगारांशी लढण्यासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रोबेशन ऑफिसरसोबत काम करतो. या चित्रपटात किम वू-बिन आणि किम सुंग-क्यून हे कलाकार आहेत.
गोली सोडा : रायझिंग (डिस्ने+ हॉटस्टार)
शुक्रवारच्या ओटीटी रिलीजच्या सूचीमध्ये एक उत्कृष्ट मालिकेचा समावेश आहे, जी तुम्हाला स्क्रीनवर चिकटून ठेवेल. ही तामिळ मालिका एका स्थानिक बाजारपेठेत काम करणाऱ्या चार मजुरांभोवती फिरते जे एका दयाळू दुकानाच्या मालकाने प्रेरित होऊन स्वतःचे भोजनालय उघडण्याचा निर्णय घेतात. विजय मिल्टन दिग्दर्शित या चित्रपटात शाम, रम्या नंबिसन आणि चेरन यांच्या भूमिका आहेत.
द ग्रँड टूर: वन फॉर द रोड (ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ)
ओटीटी रिलीजमध्ये द ग्रँड टूर: वन फॉर द रोड हा जेरेमी क्लार्कसन, जेम्स मे आणि रिचर्ड हॅमंड या प्रसिद्ध त्रिकुटावर आधारित एक चित्रपट आहे, जे एकत्र एका शेवटच्या रोड ट्रिपला निघतात आणि त्यांना प्रवासात चांगले वाईट अनुभव येतात.
सेक्टर ३६ (नेटफ्लिक्स)
नेटफ्लिक्सवर सेक्टर ३६ नावाचा एक क्राईम थ्रिलर प्रदर्शित होणार आहे. विक्रांत मेस्सी, दीपक डोबरियाल आणि आकाश खुराना अभिनीत हा चित्रपट एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे, ज्याचे आयुष्य बदलते जेव्हा, तो दिल्लीतील लहान मुलांची बेपत्ता होणारी केस हातात घेतो. त्याचा शोध त्याला एका सिरीयल किलरपर्यंत घेऊन जातो. हा चित्रपट देशात गाजलेल्या निठारी हत्याकांडावर आधारीत आहे.