मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना मलायका अरोराच्या वडिलांनी त्यांच्या वांद्रे येथील राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मलायकाचे कुटुंबीय आणि तिच्या परिचितांना धक्का बसला आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब सीमेवर वसलेल्या फाजिल्का जिल्ह्यातील रहिवासी होते. अनिलने इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले आहे. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले.
मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानही या कठीण काळात तिच्या घरी पोहोचला आहे. अरबाज खान मलायकाच्या घराबाहेर पोलिस आणि इतर लोकांशी बोलताना दिसला. मलायका त्यावेळी पुण्यात होती. घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री मुंबईहून पुण्याला रवाना झाली. अनिल अरोरा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
बातमी अपडेट होत आहे.