उर्मिला गावस यांची नगरगाव ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th September 2024, 03:21 pm
उर्मिला गावस यांची नगरगाव ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड.

वाळपई : सरपंच संध्या खाडीलकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत उर्मिला लक्ष्मण गावस याची नगरगाव पंचायतीच्या नवीन सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे 

निवडणूक अधिकारी म्हणून वाळपई गटविकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी लक्ष्मण नाईक यांची उपस्थिती होती. नगरगाव पंचायतीच्या सरपंच संध्या खाडीलकर अलिखित करारानुसार सरपंच पदाचा राजीनामा सादर केला होता. सदर राजीनामा मंजूर झाल्यानंतर नवीन सरपंच पदी निवडणूक पंचायत संचालकांनी निश्चित केली होती. मंगळवारी सकाळी ११  वाजता ही निवडणूक झाली. सरपंचपदासाठी उर्मिला गावस यांचा एकमेव अर्ज सादर झाल्यानंतर त्याची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सदर अर्ज ग्राह्य झाल्यानंतर निवडणुक अधिकारी लक्ष्मण नाईक यांनी उर्मिला गावस यांची  नवीन सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले .यावेळी उपस्थित असलेल्या मावळत्या सरपंच संध्या खाडीलकर उपसरपंच रामा खरवत व इतरांनी त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी पंचायतीचे सर्व पंच सभासद उपस्थित होते. यात उपसरपंच रामा खरवत ,पंच सभासद संध्या खाडीलकर, देवयानी गावकर, राजेंद्र अभ्यंकर ,चंद्रकांत मानकर ,मामू खरवत यांची उपस्थिती होती.