तापसी पन्नू, विक्रांत मेस्सीचा रोमँटिक-थ्रिलर फिर आयी हसीन दिलरुबा, तसेच कोरियन ॲक्शन थ्रिलर मिशन: क्रॉससह संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा रोमँटिक चित्रपट 'घुडचडी' शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासह संजय दत्त ओटीटीवर पदार्पण करत आहे. तसेच लाइफ हिल गई, ग्याराह ग्याराह, द इन्स्टिगेटर्स, जँगोसारख्या मालिकाही ओटीटीवर झळकणार आहेत.
फिर आयी हसीन दिलरुबा (नेटफ्लिक्स)
तापसी पन्नू आोंणि विक्रांत मेस्सी यांचा हिट रोमँटिक थ्रिलर हसीन दिलरुबा (२०२१) चा सिक्वेल फिर आयी हसीन दिलरुबा शुक्रवारी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. मागील भाग जेथे संपला तिथूनच हा चित्रपट सुरू होतो. राणी आणि ऋषीच्या जीवनात पुन्हा उलथापालथ होते, ज्यावेळी तिसऱ्या एका व्यक्तीचे त्यांच्या आयुष्यात पुन्हा आगमन होते. या चित्रपटात सनी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
इन्स्टिगेटर्स (अॅपल टीव्ही+)
मॅट डॅमन आणि केसी अॅफ्लेक अभिनीत, हा कॉमेडी चित्रपट चोरीसाठी एकत्र आलेल्या दाम्पत्याभोवती फिरतो. जेव्हा त्यांचा प्लान अपयशी ठरतो त्यावेळी पोलिस आणि त्यांच्या बॉसपासून वाचण्यासाठी वेगवेगळे तोडगे काढण्याचा ते प्रयत्न करतात.
बॉर्डरलँड्स (थिएटर्स)
या चित्रपटात व्हिडिओ गेममधील एका बाउंटी हंटरची कथा सांगण्यात आली आहे. जो अकल्पनीय सामर्थ्याने हरवलेल्या मुलीला वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. या साहसी-ॲक्शन चित्रपटात केट ब्लँचेट, केविन हार्ट, जॅक ब्लॅक आणि जेमी ली कर्टिस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लिसा फ्रँकेन्स्टीन (जियोसिनेमा)
लिसा फ्रँकेन्स्टाईन हा एक विनोदी-भयपट चित्रपट आहे. जो एका किशोरवयीन मुलीभोवती फिरतो. जी व्हिक्टोरियन काळातील देखण्या मृतदेहाच्या प्रेमात पडते. त्यानंंतर ती त्याच्या शरीराच्या हरवलेल्या अवयवांच्या शोधात बाहेर पडते.
प्रधान (होइचोई)
हा बंगाली चित्रपट एका तरुण पोलीस अधिकाऱ्याची कथा सांगतो. ज्याची धर्मपूर येथे बदली होते, जिथे त्याला सामाजिक आणि राजकीय आव्हानांचा सामना करावा लागतो. तो या आव्हानांवर मात करू शकेल का, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. अविजित सेन दिग्दर्शित या चित्रपटात देव, परण बंदोपाध्याय, अनिर्बान चक्रवर्ती आणि ममता शंकर मुख्य भूमिकेत आहेत.
मिशन: क्रॉस (नेटफ्लिक्स)
कोरियन मालिका आणि चित्रपटप्रेमींसाठी मिशन: क्रॉस ही कॉमेडी-ॲक्शन थ्रिलर मालिका नेटफ्लिक्स घेऊन आले आहे. जी एका निवृत्त एजंटची कथा दर्शविते. त्याची गुप्तहेर पत्नी, त्याच्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ असते जेव्हा ती एक धोकादायक मिशनवर बाहेर पडते तेव्हा तो तिच्या मिशनचा एक भाग बनतो.
टर्बो (सोनीलिव्ह)
मामूट्टीच्या चाहत्यांसाठी सोनीलिव्ह हा मल्याळम ॲक्शन-थ्रिलर घेऊन आले आहे. जो तुम्हाला अखेरपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट अरुविपुरथु जोस नावाच्या ड्रायव्हरची कथा सांगतो. ज्याला टर्बो देखील म्हणतात, जो त्याच्या मित्राच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांना लोकांना मारण्यासाठी बाहेर पडतो.
लाइफ हिल गई (डिस्नी+ हॉटस्टार)
या शुक्रवारी येणाऱ्या नवीन ओटीटी रिलिझच्या यादीमध्ये लाइफ हिल गई नावाच्या कॉमेडी मालिकेचा समावेश आहे. ही मालिका दोन भावंडांची कथा दर्शविते. ज्यांनी त्यांच्या नॉन-फंक्शनल प्रॉपर्टीचे यशस्वी हॉटेलमध्ये रूपांतर करण्याचे त्यांच्या आजोबांचे आव्हान स्वीकारले आहे. आव्हान कोण जिंकणार? शोमध्ये दिव्येंदू शर्मा, कुशा कपिला, मुक्ती मोहन, विनय पाठक आणि अतुल श्रीवास्तव यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
जँगो (लायन्सगेट प्ले)
ही मालिका जँगो नावाच्या एका वॉन्टेड गुन्हेगाराची कथा सांगतो. जो त्याच्या हरवलेल्या मुलीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. ही मालिका सर्जिओ कॉर्बुचीच्या १९६६ च्या याच नावाच्या इटालियन चित्रपटाची रिमेक आहे.
घुडछडी (जियोसिनेमा)
लाइफ हिल गई, मिशन: क्रॉस, फिर आयी हसीन दिलरुबा या शिवाय शुक्रवारी नवीन ओटीटी रिलीजच्या यादीमध्ये घूडछडी नावाच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचादेखील समावेश आहे. जो माजी प्रेमी युगुलाची कथा आहे. जे त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतात. मात्र कथेला धक्कादायक वळण मिळते जेव्हा त्यांना कळते की त्यांची मुले एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि त्यांना लग्न करायचे आहे. पुढे काय होणार? हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल. या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांच्या भूमिका आहेत.
इट एंड्स विथ अस (थिएटर्स)
इट एंड्स विथ अस हा एक रोमँटिक चित्रपट आहे, जो लिली ब्लूम नावाच्या एका महिलेच्या जीवनाचा शोध घेतो, जी व्यवसायाने एक फुलविक्रेता आहे. जिचे आयुष्य उलथापालथ होते जेव्हा तिचे बालपणीचे प्रेम तिच्या आयुष्यात परत येते. जस्टिन बालडोनी दिग्दर्शित या चित्रपटात ब्लेक लाइव्हली, ब्रँडन स्क्लेनर, जेनी स्लेट आणि हसन मिन्हाज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट कॉलीन हूवरच्या २०१६ च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.
ग्यारह ग्यारह (झी५)
ही मालिका तीन वेगवेगळ्या कालखंडात (१९९०, २००१, २०१६) घडणाऱ्या घटनांना जोडते. राघव जुयाल एका प्रामाणिक आणि मेहनती पोलिस अधिकाऱ्याची (युग आर्य) भूमिका साकारत आहे. ज्याला एक केस सोडवायची आहे, ज्याचा एक भाग तो त्याच्या बालपणात जगला आहे. या मालिकेत राघवसोबत कृतिका कामरा, धैर्य करवा, आकाश दीक्षितसह अनेक कलाकार झळकणार आहेत.