अॅरोन फारियास, इशिता कुलासोला टेबल टेनिसचा दुहेरी किताब

प्रायोरिटी गॅस्पर डायस खुली अ​खिल गोवा मेजर मानांकन टे.टे. स्पर्धा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd July, 11:04 pm
अॅरोन फारियास, इशिता कुलासोला टेबल टेनिसचा दुहेरी किताब

पणजी : अॅरोन फारियास आणि इशिता कुलासो यांनी शानदार कामगिरी करत प्रायोरिटी गॅस्पर डायस खुल्या अ​खिल गोवा मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी किताब पटकावला. या स्पर्धेचे आयोजन क्लब टेनिस दी गॅस्पर डायसने गोवा टेबल टेनिस असोसिएशनच्या (जीटीटीए) सहकार्याने केले होते.

नीझा, युग, साची आणि अथर्व यांनीही आपापल्या गटात विजेतेपद पटकावले. नीझा कामतने महिलांच्या गटात, युग प्रभूने मुलांच्या ११ वर्षांखालील गटात, साची देसाईने मुलींच्या ११ वर्षांखालील गटात, अथर्व धुळपकरने मुलांच्या १५ वर्षांखालील गटात, क्लेड बार्रेटोने ४० वर्षांवरील वयोगटात गटात, सतीश अग्रहारने ५० वर्षांवरील वयोगटात गटात आणि अरुण नाईकने ६० पेक्षा अधिक वयोगटात विजेतेपद पटकावले.

प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या उपविजेत्यांमध्ये इशान कुलासो (११ वर्षांखालील मुले), तिशा शेख (११ वर्षांखालील मुली), रिशन शेख (१५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुले), नीझा कामत (१५ वर्षांखालील मुली), प्रज्ञा कारो (१७ वर्षांखालील मुली आणि महिला), अंशुमन अग्रवाल (पुरुष), शॉन सोरेस (४०+), युसूफ शेख (५०+) आणि प्रकाश अल्फान्सो (६०+) यांचा समावेश होता.

समारोप समारंभाला प्रायोरिटी कन्स्ट्रक्शन्सचे एमडी परिंद नास्नोळकर, जीटीटीएचे अध्यक्ष सुदिन वेर्णेकर आणि जीटीटीएचे सचिव क्रिस्तोफर मिनेझिस या प्रमुख व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. याशिवाय क्लब टेनिस दी गॅस्पर डायसचे पदाधिकारी तन्मय खोलकर (सचिव), एडविन मिनेझिस (सह खजिनदार) आणि साईराज धोंड (अध्यक्ष, क्रीडा समिती) यांचा समावेश आहे.

स्पर्धेतील सविस्तर निकाल याप्रमाणे :

  • ११ वर्षांखालील मुले : युग प्रभूने इशान कोलासोचा ३-१ (११-३, १२-१०, ९-११, ११-४) पराभव केला. ११ वर्षांखालील मुली : साची देसाईने तिशा शेखचा ३-१ (११-४, ८-११, १३-११, ११-८) पराभव केला.
  • १५ वर्षांखालील मुले : अथर्व धुळपकरने रिशन शेखचा ३-१ (११-५, ८-११, ११-८, ११-७) पराभव केला. १५ वर्षांखालील मुली : इशिता कुलासोने नीझा कामतचा ३-१ (१३-११, १२-१०, ९-११, १२-१०) पराभव केला.
  • १७ वर्षांखालील मुले : अॅरोन फारियासने रिशन शेखचा ३-० (१३-११, ११-३, ११-६) पराभव केला. १७ वर्षांखालील मुली : इशिता कुलासोने प्रज्ञा कारोचा ३-० (११-५, ११-७, १३-११) पराभव केला.
  • पुरुषांचा गट : अॅरोन फारियासने अंशुमन अग्रवालचा ४-० (११-९, ११-५, ११-८, ११-७) पराभव केला. महिलांचा गट : नीझा कामतने प्रज्ञा कारोवर ३-२ (११-४, ९-११, ११-८, ७-११, ११-८) अशी मात केली.
  • ज्येष्ठ ४०+ वयोगट : क्लाईड बार्रेटोने शॉन सोरेसचा ३-२ (१०-१२, ७-११, ११-९, ११-७, ११-८) पराभव केला. ज्येष्ठ ५०+ वयोगटा : सतीश अग्रहरने युसूफ शेखचा ३-२ (४-११, ११-६, ११-६, १०-१२, १२-१०) पराभव केला. ज्येष्ठ ६०+ वयोगट : अरुण नाईकने प्रकाश अल्फान्सोचा ३-० (११-८, ११-२, ११-८) असा पराभव केला.