गोवा विद्यापीठातर्फे आयोजन : भास्कर ठरला ‘युवा विद्यापीठाश्री’
पणजी : एमईएस वसंत जोशी महाविद्यालय आर्ट्स आणि कॉमर्स, झुआरीनगरने आंतरमहाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा २०२४चे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन गोवा विद्यापीठातर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर करण्यात आले होते.
या स्पर्धेतील उपविजेतेपद सेंट झेवियर्स महाविद्यालय म्हापसाला प्राप्त झाले. स्पर्धेतील तिसऱ्या स्थानावर डीएमच्या महाविद्यालय आणि रिसर्च सेंटर, आसगावला समाधान मानावे लागले. डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय फातोर्डाच्या भास्कर गेनला ‘युवा विद्यापीठाश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. विवेक पवार, सन्माननिय अतिथी म्हणून गोवा बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे तोत्रिक अधिकारी दामोदर नाईक, गोवा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक बालचंद्र जाडर यांची उपस्थिती होती.
स्पर्धेतील सविस्तर निकाल :
६० किलो वजनी गट : सुवर्ण : समीर सिंग, एमईएस महाविद्यालय, झुआरीनगर, रौप्य : मानव काणकोणकर, एस.एस. धेंपो महाविद्यालय, कुजिरा, कांस्य : सौरभ रायकर, पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय, मडगाव. ६५ किलो वजनी गट : सुवर्ण : ब्रेंडन सावंत, सेंट झेवियर्स महाविद्यालय, म्हापसा, रौप्य : सागर राठोड, शासकीय महाविद्यालय केपे, कांस्य : हर्षद शिरोडकर, फा. आग्नेल कॉलेज, पिलर. ७० किलो वजनी गट : सुवर्ण : समर्थ भोसले, एमईएस कॉलेज, झुआरीनगर, रौप्य : शालील आरोलकर, सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा, कांस्य : अनुराग परब, धेंपो कॉलेज, कुजिरा.
७५ किलो वजनी गट : सुवर्ण : भास्कर गेन, डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, फातोर्डा, रौप्य : वेदश मल्हार, व्ही.एम. साळगावकर लॉ कॉलेज, मिरामार, कांस्य : संजीव रेवोडकर, पी.जी. गोवा विद्यापीठ.