संरक्षक भिंत कोसळून कुंडईत तिघे कामगार ठार

एक कामगार जखमी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
07th July, 06:46 pm
संरक्षक भिंत कोसळून कुंडईत तिघे कामगार ठार

फोंडा : मुसळधार पावसामुळे कुंडई येथे संरक्षक भिंत कोसळून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिलीप यादव (३७), मुकेशकुमार सिंग (३८) आणि त्रिमल नायक (४७) अशी मृतांची नावे आहेत. याव्यतिरिक्त अंकितकुमार यादव हा कामगार जखमी झाला आहे.

मुसळधार पावसाने राज्याला रविवारी झोडपून काढले. या पावसाच्या तडाख्याने अनेक भागांत पूर आला, तर काही भागांत दरडी, संरक्षक भिंती कोसळल्या. पावसाच्या माऱ्यामुळे कुंडईतही अशीच एक मोठी दुर्घटना घडली. येथील औद्योगिक वसाहतीनजिकची संरक्षक भिंत एका खोलीवर कोसळली. या खोलीत काही परप्रांतीय कामगार वास्तव्यास होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ते खोलीतच विश्रांती घेत होते. यावेळी अचानक संरक्षक भिंत खोलीवर कोसळली आणि त्याखाली हे कामगार दबले. यात दिलीप यादव (३७), मुकेशकुमार सिंग (३८) आणि त्रिमल नायक (४७) हे तिघे मृत्युमुखी पडले, तर अंकितकुमार यादव हा कामगार जखमी झाला आहे. 

या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली.


बातमी अपडेट होत आहे...