काणकोण नगराध्यक्षापदासाठी सारा देसाई यांचा अर्ज दाखल

उद्या दुपारी १२ पर्यंत अर्ज भरण्यास मुदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th May, 12:09 am
काणकोण नगराध्यक्षापदासाठी सारा देसाई यांचा अर्ज दाखल

मुख्याधिकारी मंगलदास गावकर यांच्याकडे नगराध्यक्षपदाकारीता अर्ज सादर करताना सारा देसाई. सोबत रमाकांत नाईक गावकर, सायमन रेबेलो व इतर नगरसेवक. (संजय कोमरपंत)            

काणकोण : काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या या पदावर ३० मे रोजी निवडणूक होणार असून बुधवार, दि. २९ मे रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
सोमवारी सारा शांबा देसाई यांनी मुख्याधिकारी मंगलदास गावकर यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला असून १२ नगरसेवकांच्या या नगरपालिकेत ७ जणांचा एक गट असून या ७ जणांमधील नगरसेवकांनी नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद एका अलिखित करारानुसार वाटणी तत्त्वावर वाटून घेतले असून आता पुढील नगराध्यक्ष म्हणून सारा शांबा देसाईंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदाकरीता अर्ज भरल्यावेळी मावळते नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, नगरसेवक सायमन रेबेलो, उपनगराध्यक्ष नार्सिस्को फर्नांडिस, अमिता पागी, गंधेश मडगावकर, लक्ष्मण पागी उपस्थित होते.
सारा देसाई यानी अर्ज भरल्यानंतर काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर तसेच भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.